no images were found
मी कोणत्याही आमदाराला फोन केलेला नाही :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यामुळे सर्वजण निवडून आलेले आहेत. मी कोणत्याही आमदाराला फोन केलेला नाही, कारण हक्काने सांगण्याचा शरद पवार आणि अजित पवार यांना आहे. जे नेते अजित पवार यांच्याकडे गेले आहेत त्यांना बोलण्याचा इतरांना अधिकार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीच्या ‘दोन’ बैठकांमुळे राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही गटांना किती आमदारांचा पाठिंबा आहे हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार असल्याने सर्वांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रविवारी भूकंप झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी आज मुंबईत बैठका बोलावल्या आहेत. तत्पुर्वी आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्यामुळेच सर्व आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे कोणामुळे आपण निवडून आलो आहोत हे सर्वांनी मनात ठेवावं, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.