Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठात बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी (AEDP) अभ्यासक्रमास प्रारंभ – उद्योगसज्ज पदवीसाठी सुवर्णसंधी

शिवाजी विद्यापीठात बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी (AEDP) अभ्यासक्रमास प्रारंभ – उद्योगसज्ज पदवीसाठी सुवर्णसंधी

11 second read
0
0
121

no images were found

शिवाजी विद्यापीठात बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी (AEDP) अभ्यासक्रमास प्रारंभ – उद्योगसज्ज पदवीसाठी सुवर्णसंधी

कोल्हापूर (प्रतिनिधी):, कोल्हापूरच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी (औद्योगिक प्रशिक्षण अंतर्भूत पदवी अभ्यासक्रम – AEDP) (B. Sc. Microbiology – Apprenticeship Embedded Degree Programme) या अभिनव अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC-AEDP) मार्गदर्शक तत्त्वांनुसार विकसित करण्यात आलेला हा अभ्यासक्रम शिक्षणासोबतच प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण देणारा महाराष्ट्रातील पहिला अभ्यासक्रम ठरणार आहे. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सैद्धांतिक शिक्षणासोबतच शेवटच्या सत्रात (संपूर्ण सत्र) प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण (Full-Semester Apprenticeship with stipend) दिले जाणार आहे. त्यामुळे शिक्षण व त्यासोबत प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण या दोहोंचा समन्वय साधत विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक संधींसाठी तयार करण्यात येणार आहे.

उद्योगसज्जता आणि व्यावसायिक संधी

या अभ्यासक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना उद्योगसज्ज (Industry-Ready) बनवणे हे असून या अभ्यासक्रमातून पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन संस्था, औषध निर्मिती उद्योग, दुग्ध व अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी जैवतंत्रज्ञान व जैविक खते उत्पादन, वैद्यकीय निदान प्रयोगशाळा, तसेच पर्यावरणीय विश्लेषण व संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये करिअरची संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच, इच्छुक विद्यार्थी जैवउद्योजकता (Bioentrepreneurship) क्षेत्रात स्वतःचे स्टार्टअप सुरू करू शकतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…