Home मनोरंजन थंड राहा आणि हसतमुख रहा: सोनी सब कलाकारांनी उघड केले त्यांचे उन्हाळ्यातील आवश्यक सामान

थंड राहा आणि हसतमुख रहा: सोनी सब कलाकारांनी उघड केले त्यांचे उन्हाळ्यातील आवश्यक सामान

15 second read
0
0
25

no images were found

थंड राहा आणि हसतमुख रहा: सोनी सब कलाकारांनी उघड केले त्यांचे उन्हाळ्यातील आवश्यक सामान

 उन्हाळ्याची तापमानं वाढत असताना सोनी सब चे कलाकार आपापल्या खास सवयींनी हा सीझन एन्जॉय करत आहेत. हायड्रेट राहणे, सीझनल पदार्थांचा आस्वाद घेणे आणि साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे – याच्यातून ते उन्हाळा हलका आणि आनंदी बनवतात. कुटुंबाभिमुख कथाकथनासाठी ओळखला जाणारा सोनी सब आपल्या कलाकारांना एकत्र आणतो – यादें मधील गुलकी जोशी आणि सृष्टी सिंह, पुष्पा इम्पॉसिबल मधील मुस्कान बामने, तसेच इत्ती सी खुशी मधील सुम्बुल तौकीर खान आणि रजत वर्मा. हे सर्व कलाकार त्यांच्या उन्हाळ्यातील ‘गो-टू एसेंशियल्स’ आणि पर्सनल फेव्हरेट्स शेअर करत आहेत. उन्हाळ्यात ते कसे ‘कूल’, ‘कम्फर्टेबल’ आणि ‘जॉयफुल’ राहतात याची झलक प्रेक्षकांना मिळते.

       यादें मध्ये डॉक्टर सृष्टीची भूमिका साकारणाऱ्या गुलकी जोशी यांनी सांगितले, “माझ्यासाठी उन्हाळा म्हणजे बॅलन्स – स्वतःची काळजी घेणं आणि सीझन एन्जॉय करणं. मी कधीच सनस्क्रीन स्किप करत नाही आणि हलकी स्किनकेअर वापरते ज्यामुळे त्वचा फ्रेश वाटते पण जड वाटत नाही. हायड्रेट राहणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मी पाणी, नारळपाणी आणि कधी कधी आईस्ड टी यामध्ये बदल करत राहते. वेळ मिळाला की दहीचे पदार्थ किंवा ताजे फळं खायला मला खूप आवडतं  त्यामुळे हलकं वाटतं आणि एनर्जी मिळते.”

      यादें मध्ये डॉक्टर वाणीची भूमिका साकारणाऱ्या सृष्टी सिंह यांनी सांगितले, “माझा समर रूटीन मी खूप ईझी आणि ब्रीदेबल ठेवते. कम्फर्टेबल कपडे, चांगला SPF लिप बाम आणि हायड्रेटिंग फेस मिस्ट हे नेहमी माझ्या बॅगमध्ये असतात. दिवसभर मी भरपूर पाणी आणि फ्रेश ज्यूस पिते. आणि खरं सांगायचं तर, दिवसभरानंतर घरी येऊन फॅन किंवा एसी चालू करून हातात थंड लिंबूपाणी घेणं यापेक्षा बेस्ट फीलिंग नाही.”

       पुष्पा इम्पॉसिबल मध्ये शनाया मेहताची भूमिका साकारणाऱ्या मुस्कान बामने यांनी सांगितले, “उन्हाळा आला की मला लगेच आमरस, थंड निंबूपाणी आणि कुटुंबासोबत रिलॅक्स्ड दुपार आठवते. सनस्क्रीन माझ्यासाठी मस्ट आहे कारण या उष्णतेत त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. शूटिंगदरम्यान मी नेहमी वॉटर बॉटल सोबत ठेवते, हायड्रेट राहण्यासाठी. आणि खरं सांगायचं तर, दिवसभरानंतर घरी आल्यावर थंड ताकाचा ग्लास त्याला काहीच तोड नाही. सिंपल आहे पण खूप रिफ्रेशिंग.”

       इत्ती सी खुशी मध्ये अन्विता ची भूमिका साकारणाऱ्या सुम्बुल तौकीर खान यांनी सांगितले, “माझ्यासाठी उन्हाळा म्हणजे कम्फर्ट. सैल कॉटन कपडे हे मस्ट आहेत, कारण या हवामानात त्याने खूप फरक पडतो. मी नेहमी रोज वॉटर स्प्रे सोबत ठेवते, लांब शूटिंगदरम्यान लगेच फ्रेश वाटतं. आणि आईस्क्रीम तर नॉन-नेगोशिएबल आहे! सेटवर छोटा ब्रेक असो किंवा घरी रिलॅक्स करणं अशा छोट्या ट्रीट्समुळे सीझन हलका आणि हॅप्पी वाटतो.”

      इत्ती सी खुशी’मध्ये विराटची भूमिका साकारणारे रजत वर्मा यांनी सांगितले, “माझ्या मते उन्हाळ्यात ‘कूल’ आणि एनर्जेटिक राहणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाहेर जाताना मी नेहमी सनग्लासेस आणि कॅप वापरतो, त्यामुळे उन्हाचा त्रास कमी होतो. नारळपाणी हे माझं फेव्हरेट आहे दिवसभर हायड्रेट आणि फ्रेश ठेवतं. आणि वेळ मिळाला की थंड फळं, विशेषतः कलिंगड, खायला मला खूप आवडतं. हेल्दी आहे आणि या सीझनसाठी परफेक्ट.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…