Home स्पोर्ट्स कोल्हापूर जिल्हा सब ज्युनिअर निवड बुद्धिबळ स्पर्धांना शानदार प्रारंभ !!

कोल्हापूर जिल्हा सब ज्युनिअर निवड बुद्धिबळ स्पर्धांना शानदार प्रारंभ !!

4 second read
0
0
138

no images were found

कोल्हापूर जिल्हा सब ज्युनिअर निवड बुद्धिबळ स्पर्धांना शानदार प्रारंभ !!

कोल्हापूर (प्रतिनिधी): चेस असोसिएशन कोल्हापूर आयोजित कोल्हापूर जिल्हा सब ज्युनिअर पंधरा वर्षाखालील खुला गट व मुलींच्या पंधरा वर्षाखालील गटातील निवड  बुद्धिबळ स्पर्धांना शानदार प्रारंभ झाला. या स्पर्धा आयोध्या टॉवर्स या ठिकाणी होत आहेत. आज झालेल्या तिसऱ्या फेरी अखेर खुल्या गटामध्ये स्वरूप साळवे , वंशील ठक्कर , अथर्व तावरे , वेदांत बांगड , सर्वेश पोतदार , अथर्व सुतार हे सहा खेळाडू तीन पैकी तीन गुणांसह आघाडीवर आहेत. मुलींच्या गटामध्ये संस्कृती सुतार ही तीन पैकी तीन गुणांसह आघाडीवर आहे तर अरीना मोदी , सृष्टी जोशीराव या दोघी अडीच गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. तर सिद्धी कर्वे , स्नेहल गावडे , सिद्धी बुबणे , नंदिनी सारडा , वेदिका मदने या बुद्धिबळपटू दोन गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत.

      या स्पर्धेमध्ये जवळजवळ 70 बुद्धिबळपटूनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्कर्ष लोमटे , प्रीतम घोडके , आरती मोदी , रोहित पोळ , प्रशांत पिसे हे उपस्थित होते. या स्पर्धेमधून खुल्या गटातून चार बुद्धिबळ खेळाडू आणि मुलींच्या गटातून चार बुद्धिबळ खेळाडू यांची निवड राज्यस्तरीय सब जुनिअर बुद्धिबळ स्पर्धेसाठी होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप गोकुळचा स्वच…