no images were found
वागळे की दुनिया मालिकेत सखी आणि विवानच्या साखरपुड्यामुळे नवा ट्विस्ट
सोनी सबवरील ‘वागळे की दुनिया-नयी पिढी नये किस्से’ या मालिकेत एका मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबासमोरील दैनंदिन अडचणी आणि आनंदाचे चित्रण करण्यात आले आहे. यात भावनिक प्रसंग आणि विनोद यांचा मिलाप पहायला मिळतो. राधिका (भारती आचरेकर) हिच्या स्मृतीभ्रंशापासून ते सखी (चिन्मयी साळवी) हिचे विवान (नमित शाह) यांचे फुलणारे नाते यांसारख्या भावनिक आव्हानांमधून वागळे कुटुंब सावरत असतानाच.. राजेश (सुमित राघवन) हा स्वत:ला एक संरक्षक पिता आणि आधुनिक पिता या दोहोंमध्ये विभागलेला पाहतो.
आगामी भागांमध्ये राजेश एक अनपेक्षित पाऊल पुढे टाकतो. तो सखी आणि विवानच्या साखरपुड्यासाठी तयार होतो. पण त्यासाठी काही अटी घालतो. 21 दिवसांच्या ‘नो काँटॅक्ट’ चॅलेंजमधून त्यांच्या वचनबद्धतेची परीक्षा पाहिल्यानंतर आणि कौटुंबिक संकटात विवानने दाखवलेल्या सतर्कतेमुळे, राजेश थोडा नरमतो. पण राजेश जसा या दोघांचे नाते स्वीकारायला जातो, तशी नवीनच कसोटी त्याची वाट पाहत असते. राजेश विवानच्या पालकांना भेटतो. दोन्ही कुटुंब पहिल्यांदाच भेटतात, तेव्हा त्यांना काही सांस्कृतिक फरक, भिन्न सामाजिक पार्श्वभूमी, भिन्न अपेक्षा निदर्शनास येतात. मध्यमवर्गीय मूल्यांमध्ये खोलवर रुजलेला राजेश विचार करतो की, खरोखरच हे नव्याने जुळणारे नाते योग्य आहे की नाही?
राजेश अजूनही आपल्या मुलीच्या निवडीवर ठाम राहील का? की त्याने स्वीकारलेल्या प्रत्येक गोष्टीला या भेटीमुळे वेगळे वळण मिळेल?
राजेशची भूमिका साकारणारे सुमित राघवन सांगतात, “अनेक पालकांना अनुभवावा लागणारा हा एक वास्तविक संघर्ष आहे. आपल्या मुलांचे संरक्षण करण्याची भूमिका ते त्यांच्या निवडीवर विश्वास ठेवण्यापर्यंतचा हा बदल आहे. राजेश प्रेमाच्या विरोधात नाही, पण त्याला फक्त सखीसोबतचे त्याचे जवळीकतेचे नाते गमावण्याची भीती आहे. साखरपुड्याला होकार देणे हे त्याच्यासाठी एक मोठे पाऊल आहे. पण विवानच्या पालकांची भेट घेतल्यावर त्याच्या मनात नवीन शंका आणि विचार येऊ लागतात. पित्याच्या भूमिकेतील स्वीकार, अहंकार आणि जुळवून घेण्याची क्षमता.. यांची अत्यंत शांत पण कठीण अशी ही परीक्षा आ