
no images were found
विद्यार्थी विकास कक्षामार्फत एक एकदिवशीय कार्यशाळा
कोल्हापूर (प्रतिनिधी): विद्यार्थी विकास विभागामार्फत सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी विकास कक्षाच्या प्रमुखांसाठी दि. 20/02/2024 रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये या विभागामार्फत विद्यार्थासाठी घेण्यात येणा-या विविध योजनांची माहिती सांगण्यात आली. तसेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थासाठी घ्यावयाच्या विविध कार्यक्रमाबद्दल साधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हयामधील महाविद्यालयातील एकूण ११५ समन्वयक सहभागी झालेले होते.
सदर कार्यशाळेमध्ये विकसित भारत @ २०४७ या विषयावर विद्यापीठ स्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये एकूण ९० विद्यार्थानी सहभाग नोदविला व त्यामधुन खालील विद्यार्थानी क्रमांक प्राप्त केले होते. खालील नमुद क्रमांक प्राप्त विद्यार्थाचा सत्कार कार्यक्रमामध्ये करण्यात आला. क्रमांक विद्यार्थाचे नाव महाविद्यालयाचे नाव प्रथम श्रीमती भोसले साक्षी आनंद आर्ट्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज , नागठाणे द्वितीय श्री. चव्हाण प्रणील बाबुराव भुगोल अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर तृतीय श्रीमती कुंभार कोमल विनायक म. ह. शिंदे महाविद्यालय, तिसंगी उत्तेजनार्थ श्रीमती वायदंडे श्रावणी संजय आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी, आष्टा
उत्तेजनार्थ श्रीमती थोरात तनुजा राजेद्र चंद्राबाई शंत्ताप्पा शेंडूरे कॉलेज, हुपरी सदर कार्यषाळेचे उद्धाटन मा. प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्र-कुलगुरु यांचे शुभहस्ते संपन्न झाले. सदर कार्यशाळेसाठी डॉ. पी. टी. गायकवाड संचालक, विद्यार्थी विकास, डॉ. देवानंद सोनटक्के, डॉ. आर. एच. अतिग्रे, डॉ. एस. डी. जाधव व विद्यार्थी विकास मंडळाचे व विद्यार्थी विकास कक्षाचे सदस्य उपस्थित होते.