Home मनोरंजन सोनी सबच्या कलाकारांमध्ये ऋषी सक्सेनाचा समावेश, अन्विताचा सायलेंट लव्हर आणि पोलिसाची भूमिका

सोनी सबच्या कलाकारांमध्ये ऋषी सक्सेनाचा समावेश, अन्विताचा सायलेंट लव्हर आणि पोलिसाची भूमिका

2 second read
0
0
56

no images were found

सोनी सबच्या कलाकारांमध्ये ऋषी सक्सेनाचा समावेश, अन्विताचा सायलेंट लव्हर आणि पोलिसाची भूमिका

मुंबई, : सोनी सबवरील आगामी कौटुंबिक मालिका ‘इत्ती सी खुशी’ ही अत्यंत वेगळ्या संकल्पनेमुळे तसेच सुंबुल तौकीर खान (अन्विता दिवेकरच्या भूमिकेत), वरूण बडोला (सुहास दिवेकर) आणि रजत वर्मा (विराट) यांसारख्या कलाकारांच्या दमदार टीममुळे प्रेक्षकांमधली उत्सुकता वाढवत आहे. या मालिकेत संजयच्या भूमिकेत ऋषी सक्सेना दिसणार आहे. तो एक चाणाक्ष नजरेचा पोलीस अधिकारी असून त्याच्यामुळे कथानकाला वेगळे वळण मिळेल. अन्विता आणि विराटच्या जगात संजय प्रवेश करतो आणि त्यामुळे त्यांच्या जगात वादळ घेऊन येतो.

संजय हा माणूस नेहमीच शांत, स्थिर आणि विश्वासार्ह व्यक्ती आहे. तो अन्विताचा मित्र आणि जुना शेजारी असल्याने तिच्या जीवनातील इतर लोकांपेक्षा तो तिला जास्त चांगल्या पद्धतीने ओळखतो. संजयवर अन्वितादेखील सर्वाधिक विश्वास ठेवते. पण त्याच्या प्रेमाची परतफेड ती करू शकेल की नाही, याबद्दल तिच्या मनात शंका आहे.

आपल्या पात्राबद्दल बोलताना ऋषी सक्सेना म्हणाला,”मी इत्ती सी खुशी मालिकेचा भाग बनण्यासाठी खूप उत्सुक आहे. कारण हे कथानक खूप खरेखुरे वाटते. छोटे छोटे क्षण खूप काही सांगून जातात. संजय हा माणूस फार बोलत नाही, पण जेव्हा गरज असेल तेव्हा तो बोलतोच. या भूमिकेबद्दल एक गोष्ट उत्साहित करत आहे, ती म्हणजे संजय कधीही हिरो बनण्याचा प्रयत्न करत नाही. तो फक्त एक काळजी घेणारा माणूस आहे आणि अन्विताला सर्व बाजूंनी समजावून घेतो. अन्विताबद्दल त्याच्या भावना स्पष्ट आहेत. पण तिला त्या भावना नसतील, हे त्याला माहिती आहे. आशा आणि स्वीकार या दोहोंमध्ये तो आहे, यामुळेच तो जास्त खरा आहे.. ” 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…