Home शासकीय सार्वजनिक ठिकाणी आढळणारी तीन जनावरे जप्त

सार्वजनिक ठिकाणी आढळणारी तीन जनावरे जप्त

6 second read
0
0
108

no images were found

सार्वजनिक ठिकाणी आढळणारी तीन जनावरे जप्त

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी भटकणाऱ्या पाळीव आणि भटक्या जनावरांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. आज या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या पथकाने वर्षानगर, मालती अपार्टमेंट व शाहूमिल कॉलनी लकी बझार येथून प्रत्येक एक प्रमाणे 3 जनावरे जप्त केली. ही जनावरे आंबा येथील शासन अनुदानीत गो शाळेकडे पाठविण्यात आली आहेत.

         प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायकारक वागणुकीला आळा बसावा यासाठी प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 335 मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे. नागरीकांनी आपल्या पाळीव जनावरांना मोकाट सोडू नये, अशा मोकाट जनावरे सोडणा-यावर महापालिकेच्यावतीने जनावरे जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्या…