no images were found
‘वसुधा’मधील मनदीप कौर अभिनेत्री बनण्याआधी होती एक शालेय शिक्षिका!
झी टीव्हीवरील ‘वसुधा’ ह्या मालिकेने आपल्या नाजूक कथाकथन आणि भावनिक नाट्य यांच्या जोरावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रॉडक्ट लॉंचच्या वेळेस बॉम्ब ठेवणारी करिष्मा (प्रतिक्षा राय) आणि चौहान परिवाराच्या विरोधात दुष्ट कारवाया करणारी मेघा (मनदीप कौर) या दोन बहिणींसह मालिकेतील गूढ अधिकाधिक वाढत चालले आहे. तरीही मेघाच्या शांत आणि दुष्ट व्यक्तिरेखेमागे मनदीप कौरचा परिवर्तनशील प्रवास असून तो कॅमेऱ्यासमोर नाही तर शालेय वर्गामध्ये सुरू झाला होता.
टेलिव्हिजनच्या दुनियेमध्ये पाऊल ठेवायच्या आधी मनदीप एक शालेय शिक्षिका होती आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवत होती. तिच्यासाठी टिचिंग केवळ एक प्रोफेशन नव्हते तर तिला त्याची उत्कट आवड होती. पण तिच्या ह्या दैनंदिन रूटिनमध्येच तिच्यात एक कलात्मक ठिणगी होती जी तिने दिलेल्या एका टेलिव्हिजन जाहिरातीच्या ऑडिशनमध्ये दिसून आली. त्यातून सुरू झालेल्या प्रयोगातून पुढे जाहिराती ते पंजाबी सिनेमा आणि आता हिंदी मनोरंजन वाहिनीवरील तिचा प्रवास संपन्न झाला. एका वेळेस एक एक भूमिका करत मनदीप परफॉर्मर म्हणून प्रगल्भ झाली.
मनदीप कौर म्हणाली, “शिकवणे हे केवळ माझ्यासाठी काम नव्हते तर ती माझी ओळख होती. मला वर्गातील ती ऊर्जा, कल्पनांची देवाणघेवाण आणि माझ्या विद्यार्थ्यांचा विकास होत असल्याचे पाहणे हे अतिशय आवडायचे. आयुष्य आपल्याला नवीन दिशेकडे घेऊन जाते. मी एका छोट्या टीव्ही जाहिरातीसाठी सर्वप्रथम कॅमेऱ्यासमोर उभी राहिले आणि त्यावेळची ती भावना आजही मला आठवते. अभिनय हा माझ्यासाठी एक नवीन भाषा बनली, ज्यामुळे मी सर्वकाही व्यक्त करू लागले. एका संधीतून दुसरी संधी मिळत गेली आणि हळूहळू माझे ह्या कलेवर प्रेम जडले.”
ती पुढे म्हणाली, “मेघाची भूमिका साकारणे हा माझ्यासाठी सर्वांत समृद्ध करणारा अनुभव राहिला आहे. ती नेहमीची स्टिरिओटिपीकल खलनायिका नाहीये. ती हुशार, शांत आणि जटिलतचे स्तर असलेली अशी व्यक्ती आहे. ती कायम प्रेक्षकांसमोर एक गूढपणा राखते. मला खरंच वाटतं की शिक्षिका म्हणून माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवाने मला ह्या भूमिकेतही मदत केली आहे – विद्यार्थ्यांचे निरीक्षण करणे, त्यांच्या भावना समजून घेणे. पुढे काय होईल यासाठी मी उत्साहात आहे आणि जसजशी कथा पुढे सरकेल तसतसे प्रेक्षक कशी प्रतिक्रिया देतील ते जाणून घेण्यासाठीही उत्सुक आहे.”धडे शिकवण्यापासून नाट्यमय प्लॉट वळणांपर्यंत मनदीप कौरचा शिक्षणापासून मनोरंजनापर्यंतचा प्रवास हा अतिशय प्रेरणादायी आहे आणि अगदी अनपेक्षित सुरुवातींमधून शक्तीशाली परफॉर्मन्सेस कसे निर्माण होऊ शकतात याचे एक उत्तम उदाहरण आहे. गूढ वाढत असताना काय मेघा चौहान परिवाराचा आतून नाश करण्याच्या आपल्या मिशनमध्ये विजय होईल की तिचे सत्य उघडकीस येईल?