no images were found
बी.वाय. जोशी यांनी द वेल्थ कंपनीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
मुंबई,: द वेल्थ कंपनी या पँटोमॅथ ग्रुप कंपनीने आज एक घोषणा केली आहे. द वेल्थ कंपनीच्या मालमत्ता व्यवस्थापन शाखेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या क्षेत्रातील एक आघाडीचे आणि अनुभवी अधिकारी श्री. भालचंद्र जोशी (बी.वाय. जोशी) यांची नियुक्ती जाहीर केली आहे. भारताच्या बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ टीम लीड करण्याचा अनुभव असलेल्या श्री. बी.वाय. जोशी यांच्या याच अनुभवाचा कंपनीला निश्चितच फायदा होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) म्हणून श्री. बी.वाय. जोशी एकूणच कामकाजावर देखरेख ठेवतील आणि ऑपरेशनल एक्सलन्स, तंत्रज्ञान तसेच एआय-नेतृत्वाखालील नवोपक्रम आणि प्रगतीचे कायमस्वरूपी उपक्रम राबवत. यासोबतच कंपनीचा ग्राहक प्रथम दृष्टिकोन राबवतच भागधारकांसाठी धोरणात्मक मूल्य निर्मितीला चालना देतील. यामुळे द वेल्थ कंपनीचे स्थान अधिक मजबूत होईल.
श्री. बी.वाय. जोशी हे वित्तीय सेवा उद्योगातील एक अनुभवी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी मार्केटिंगमध्ये एमबीए केले असून मालमत्ता आणि संपत्ती व्यवस्थापन ऑपरेशन्समधील सखोल ज्ञान त्यांच्याकडे आहे. ते मान्यताप्राप्त आर्थिक नियोजक आहेत. द वेल्थ कंपनीमध्ये, आतापर्यंत त्यांनी अनेक मान्यताप्राप्त संस्थांमध्ये वरच्या स्तरावर काम केले आहे. त्यांच्या याच धोरणात्मक अनुभवाचा फायदा द वेल्थ कंपनीला होणार आहे. यापूर्वी श्री. बी.वाय. जोशी यांनी 360 वन वेल्थ अँड ऍसेट मॅनेजमेंटमध्ये मार्केटच्या गरजांप्रमाणे व्यावसायिक धोरण आखणे तसेच ऑपरेशनल उद्दिष्टे त्याच्याशी जोडलेली ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या प्रतिष्ठित कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. यात सायब्रिला टेक्नॉलॉजीजमध्ये ग्लोबल स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्सचे प्रमुख, एएमसी बोर्डाचे सदस्य, व्हाइटओक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीओओ आणि निप्पॉन लाईफ इंडिया ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये सेवा वितरण आणि कामकाज उत्कृष्टता प्रमुख आदींचा समावेश आहे. आयसीआयसीआय बँक लिमिटेड, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि सिटी बँक या भारतातील प्रीमियम बँकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.
नियुक्तीवर भर देताना, वेल्थ कंपनी अॅसेट मॅनेजमेंट होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या एमडी आणि सीईओ सुश्री मधू लुनावत म्हणाल्या, “आमच्या भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि श्री. जोशी यांची नियुक्ती हा त्या दृष्टिकोनातून घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे. द वेल्थ कंपनीच्या अॅसेट मॅनेजमेंट शाखेतही ग्राहकांनाच प्राधान्य दिले जात असून जोशी यांच्या नेतृत्वाखाली कंपनी ऑपरेशनल उत्कृष्टतेसाठी नवीन बेंचमार्क स्थापित करेल, असा आम्हाला विश्वास आहे. श्री. जोशी यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांची कार्यक्षमतेवर भर देणारी मानसिकता आणि त्यांच्या क्षेत्रातील त्यांना असलेले सखोल ज्ञान परिसंस्थेला आकार देण्यात आणि आमच्या धोरणात्मक दृष्टिकोनाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.”
लुनावत यांनी मांडलेले मुद्दे पुढे नेत वेल्थ कंपनी ऍसेट मॅनेजमेंट होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भालचंद्र जोशी म्हणाले, “बाजारपेठेतील कार्यक्षमता वाढवण्यासाठी वचनबद्ध असलेल्या कंपनीत सहभागी होण्याचा मला खरोखर खूप आनंद होत आहे. गेल्या तीन दशकांमध्ये, मी वित्तीय सेवा उद्योगातील उल्लेखनीय उत्क्रांती पाहिली आहे. मात्र त्यापैकी काहीच कंपन्यांमध्ये विचारांची स्पष्टता आणि वेग आढळतो. या दोन्ही गोष्टी द वेल्थ कंपनीकडे आहेत. व्यावसायिक वाढीसोबतच दीर्घकालीन मूल्य निर्मितीमध्ये योगदान देण्यास आणि गतिमान तसेच टिकाऊ भविष्यासाठी एक मजबूत पाया रचण्यासाठी सहकार्य करण्यास मी उत्सुक आहे.”
विशेष म्हणजे, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI-OPCO) च्या ऑपरेशन्स अँड कम्प्लायन्स कमिटीचे सदस्य म्हणून 10 वर्षे आणि म्युच्युअल फंड युटिलिटीज (MFU) चे बोर्ड सदस्य म्हणून सात वर्षे काम करत असताना मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात श्री. बी.वाय. जोशी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ऑपरेशन्स, कम्प्लायन्स अँड रिस्क, म्युच्युअल फंड्स, कस्टमर एक्सपीरियन्स, इन्व्हेस्टर सर्व्हिसिंग, डिस्ट्रिब्युटर मॅनेजमेंट, डिजिटल आणि टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह्ज तसेच गेम चेंजिंग इंडस्ट्री फर्स्ट सर्व्हिस सेंटरिक सोल्यूशन्सचा त्यांना चांगला अनुभव आहे. भारतीय मालमत्ता आणि संपत्ती व्यवस्थापनातील सर्वात यशस्वी आणि बहुमुखी व्यावसायिकांपैकी एक अशी श्री. बी.वाय. जोशी यांची ओळख आहे.
जोशी यांचे नेतृत्व, उद्योग दूरदृष्टी आणि उत्कृष्टतेचा ट्रॅक रेकॉर्ड याच्या साहाय्याने श्री. बी.वाय. जोशी हे द वेल्थ कंपनीच्या विकासाच्या पुढील टप्प्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज आहेत. या प्रवासात सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर असेल. तसेच ऑपरेशनल लवचिकता आणि भागधारकांना योग्य मूल्य प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट सेवा देणारे तसेच मालमत्ता व्यवस्थापन सेवांच्या क्षेत्रात शाश्वत परिवर्तनासाठी नवीन मानके स्थापित करणारे असे उद्योग जगतातील उपक्रम सुरू करेल.