Home Video कोल्हापूर शहर येथे झालेल्या गुरुपौर्णिमेसाठी १ हजार २०० जिज्ञासूंची उपस्थिती ! 

कोल्हापूर शहर येथे झालेल्या गुरुपौर्णिमेसाठी १ हजार २०० जिज्ञासूंची उपस्थिती ! 

12 second read
0
0
38

no images were found

कोल्हापूर शहर येथे झालेल्या गुरुपौर्णिमेसाठी १ हजार २०० जिज्ञासूंची उपस्थिती ! 

 

कोल्हापूर(प्रतिनिधी ): –  भारतावर अंतर्गत आणि बाह्य शत्रूंकडून जी आक्रमणे होत आहेत, ती केवळ विस्तारवादासाठी नाही, तर हिंदु धर्माला संपवण्यासाठी होत आहेत. पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी ‘देश’ विचारून नाही, तर ‘धर्म’ विचारून गोळ्या झाडल्या. आतापर्यंतच्या दंगलींचा इतिहासही हेच सांगतो, जेथे जेथे धर्मांध माजले, तिथे त्यांनी हिंदूंना, हिंदूंच्या प्रतिकांना, हिंदूंच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य केले. आपण सध्या युद्धाच्या सावटाखाली आहोत. किंबहुना संपूर्ण पृथ्वीच अधर्माच्या छायेत आहेत. वरवर पहाता हे सीमेवर होणारे युद्ध वाटत असले, तरी वास्तवात ते धर्मयुद्धच आहे. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या आणि न्यायाच्या बाजूने लढणार्‍यांपेक्षा अधर्मियांची संख्या आणि शस्रबळ दोन्ही अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचा झाला; कारण भगवंताचा आशीर्वाद धर्माच्या बाजूने लढणार्यांसाठी होता. आजही परमकल्याणकारी गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी, तसेच भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. आपले कर्तव्य हे आहे की, एक व्यक्ती म्हणून, केवळ परिवारापुरता विचार न करता राष्ट्र आणि धर्म कार्यामध्ये स्वतःला झोकून देणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी केले. ते ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर गुरुवार, १० जुलै २०२५ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, लकी बझारच्या वर, राजारामपुरी येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती,  तमिळ, तेलुगु, मल्याळम्, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात ७७ ठिकाणी, तर  कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहर आणि गडहिंग्लज येथे विनायक प्लाझा, देसाई मंगल कार्यालय अशा २ ठिकाणी हे महोत्सव पार पडले. 

 

या महोत्सवात प्रारंभी श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन) करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. यानंतर सनातन राष्ट्र शंखनाद सोहळ्याचा प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण झाल्यावर रामराज्य स्थापनेसाठी संकल्प आणि सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला. या महोत्सवात  ‘साधनेचे मौलिक दृष्टीकोन’ या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करतांना ‘असत्यमेव जयते’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याव्यतिरिक्त धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि राष्ट्र-धर्म विषयक फलक प्रदर्शनही महोत्सवस्थळी लावण्यात आले होते. या महोत्सवात ‘साधनेचे मौलिक दृष्टीकोन’ या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…