Home मनोरंजन दिवाळी सणाबाबतचे खास अनुभव

दिवाळी सणाबाबतचे खास अनुभव

1 min read
0
0
47

no images were found

िवाळी सणाबाबतचे खास अनुभव

सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’मध्‍ये करिष्‍मा सिंगची भूमिका साकारणारी युक्‍ती कपूर म्‍हणाली, “दिवाळी हा माझा आवडता सण आहे. मी माझे कुटुंब व मित्रांसोबत हा सण साजरा करते. मला मालिका ‘मॅडम सर’च्‍या शूटिंगमधून काही मोकळा वेळ मिळणार आहे, म्‍हणून मी दिवाळी सण साजरा करण्यासाठी माझ्या मूळगावी जयपूरला जाणार आहे. मला माझ्या कुटुंबासोबत चांगला वेळ व्‍यतित करण्‍यास मिळेल. सर्व कुटुंब सण साजरा करण्‍यासाठी एकत्र येईल आणि मी यंदा माझ्या कुटुंबासोबत दिवाळी सण साजरा करण्‍यासाठी अत्यंत उत्सुक आहे. मी सर्वांना सुरक्षितता बाळगण्‍याचे, फटाके न वाजवण्याचे आणि कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ व्‍यतित करण्‍याचे आवाहन करते.’’

सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’मध्‍ये हसीना मलिकची भमिका साकारणारी गुल्‍की जोशी म्‍हणाली, “मी दरवर्षी दिवाळी सण साजरा करण्‍यासाठी खूपच उत्‍सुक असते. हा माझा आवडता सण आहे. मला दिव्‍यांचा हा सण खूप आवडतो आणि मी कंदिल व दिव्‍यांसह घराला सुशोभित करण्‍याचा आनंद घेते. हा सण मला नेहमीच अत्‍यंत सकारात्‍मक व नवीन भावना देतो. माझ्यासाठी दिवाळी सण म्‍हणजे आकर्षक पोशाख घालणे आणि माझ्या घराला सजवणे, ज्‍याचा मी भरपूर आनंद घेते. प्रत्‍येकाने हा दिवाळी सण साजरा करण्‍याचा आनंद घेतला पाहिजे आणि माझ्याकडून सर्वांना आनंदमय दिवाळीच्‍या शुभेच्‍छा.’’

सोनी सबवरील मालिका ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’मध्‍ये चिराग पटेलची भूमिका साकारणारा दर्शन गुर्जर म्‍हणाला, “मी नशीबवान आहे की, मला मालिका ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’च्‍या सेटवर माझ्या प्रेमळ कलाकारांसोबत दिवाळी सण साजरा करायला मिळणर आहे. आम्‍ही लहान सेलिब्रेशन करणार आहोत. चाहत्‍यांना लवकरच आमच्‍या सोशल मीडियावर याबाबत पाहायला मिळेल. माझ्यासाठी या सणाची खासियत म्‍हणजे मला माझे मित्र व कुटुंबाला भेटायला मिळणार आहे आणि आम्‍ही सर्व एकत्र सण साजरा करणार आहोत. माझे चाहते आणि मालिका ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’च्‍या प्रेक्षकांना मला इतकेच सांगायचे आहे की, सर्वांनी सुरक्षितता बाळगत हा सण साजरा करा आणि प्रेम व आनंदाचा प्रसार करा. मी आशा करतो की, हा सण सर्वांच्‍या जीवनात सकारात्‍मकता आणेल.’’

सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया’मध्‍ये सखी वागलेची भूमिका साकारणारी चिन्‍मयी साळवी म्‍हणाली, “दिवाळी हा वर्षातील सर्वोत्तम सण आहे. हा सण सर्वांना ते कुठेही राहत असले तरी एकत्र आणतो आणि एकत्र उत्तम वेळ व्‍यतित करण्‍याची संधी देतो. आमच्‍या घरामध्‍ये आम्‍ही सर्व किचनमध्‍ये विविध प्रकारचा फराळ बनवतो जसे करंजी व चकली आणि आमच्‍यामधील प्रेम व प्रयत्‍नांमुळे हा फराळ खूपच चविष्‍ट बनतो. नवीन कपडे खरेदी करायला जाणे, रांगोळी डिझाइन्‍स ठरवणे आणि कुटुंब व मित्रांच्‍या घरी जाणे यामधून खूप मोठा आनंद मिळतो. आम्‍ही लहानपणी फटाके वाजवण्‍याचा आनंद घ्‍यायचो, पण अलिकडील वर्षांमध्‍ये आम्‍ही फटाके टाळले आहेत आणि यंदा देखील पर्यावरणाच्‍या रक्षणासाठी फटाके वाजवणार नाही. एकूण सणामधील धमाल व आनंद पाहून हा सण कधीच संपू नये असे मला वाटते.’’

सोनी सबवरील मालिका ‘वागले की दुनिया’मध्‍ये वंदना वागलेची भूमिका साकारणारी परिवा प्रणती म्‍हणाली, ‘’दिवाळीदरम्‍यान आपल्‍या आसपासचे वातावरण रोषणाई व आनंदाने भरून जाते, ज्‍यामुळे मला हा सण खूप आवडतो. दिवाळीला सर्व मित्र व कुटुंबिय एकमेकांना भेट देऊन फराळाचा आस्‍वाद घेतात, एकत्र रांगोळी काढतात आणि लक्ष्‍मीपूजा देखील करतात. तसेच भाऊबीजेला आम्‍ही भाऊ-बहीण एकत्र येऊन खूप धमाल करतो. दिवाळी म्‍हणजे खरेदी करणे, घराला सुशोभित करणे आणि आपल्‍या प्रियजनांसोबत फराळाचा छान आस्‍वाद घेणे.’’

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…