
no images were found
सिद्धार्थ मल्होत्राने सांगितले ‘थॅंक गॉड’ चित्रपट स्वीकारण्याचे कारण
सणासुदीचा मोसम उत्साहात सुरू झाला आहे. प्रत्येकाचे जीवन उळजून टाकण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात प्रेम, भाग्य आणि आनंद भरून टाकण्यासाठी दिवाळी आली आहे. या वातावरणाला मनोरंजनाचा तडका देण्यासाठी बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण आपले थॅंक गॉड’ चित्रपटाचे सह-कलाकार सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत सिंह आणि दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्यासह सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सर्वांच्या लाडक्या द कपिल शर्मा शो मध्ये या रविवारी, 23 ऑक्टोबर रोजी येणार आहे. आमंत्रित पाहुणे, कपिलच्या नवीन परिवारासह या भागातील धमाल विनोदी गॅग्सचा मनमुराद आनंद लुटतील.पटकथेत नेहमी असे काही तरी असते, ज्याकडे अभिनेते आकृष्ट होतात आणि चित्रपट स्वीकारतात. कपिल शर्माशी दिलखुलास गप्पा मारताना सिद्धार्थ मल्होत्राने सांगितले की, त्याने थॅंक गॉड चित्रपट कोणत्या कारणाने स्वीकारला. तो म्हणतो, “आपल्या देशात आपला कर्मावर विश्वास आहे आणि त्यामुळे ‘करावे तसे भरावे’ ही संकल्पना आपल्याला पटते. लेखक आणि इंद्र सर यांनी हीच कल्पना या चित्रपटात सुंदर पद्धतीने मांडली आहे.” अजय देवगण मध्येच म्हणाला की, “कपिलचा तर यावर विश्वास नाही” त्याला सिद्धार्थ मल्होत्रा आणि अर्चना पूरणसिंहने एका स्वरात उत्तर दिले की, “इसकी करनी और भरनी अलग है. जिस तरह करता है उससे कहीं ज्यादा भर देता है (हसतो).”सिद्धार्थ पुढे म्हणाला, “या चित्रपटात एका अशा माणसाची गोष्ट आहे, ज्याच्यात अनेक दोष आहेत पण त्याला निम्न मध्यमवर्गातून बाहेर येऊन वरच्या वर्गात, बरेच वर जायचे आहे. हे साध्य करण्यासाठी तो काय काय करतो, त्याची ही गोष्ट. या सगळ्या खटपटीत त्याचा एक अपघात होतो, तो वर जातो आणि चित्रगुप्ताला भेतो, जेथे एक खेळ खेळल्यानंतर हे नक्की व्हायचे असते की, तो स्वर्गात जाईल की नरकात. मला ही व्यक्तिरेखा आणि चित्रपटाची संकल्पना आवडली.इन्द्र सरांनी हे सगळे विनोदी पद्धतीने मांडले आहे. दिवाळीसाठी हा एक उत्तम कौटुंबिक-विनोदी चित्रपट आहे!”या भागात सिद्धार्थ मल्होत्रा कपिल शर्माच्या नवीन डॅशिंग लुकचे कौतुक करताना दिसेल. स्वतः फिटनेस फ्रीक असलेला सिद्धार्थ कपिल शर्माला त्याच्या फिटनेसचे रहस्य विचारेल!