Home मनोरंजन “आजच्या डिजिटल युगात ओळखीचा सर्रास गैरवापर होतो.: परिवा प्रणती 

“आजच्या डिजिटल युगात ओळखीचा सर्रास गैरवापर होतो.: परिवा प्रणती 

4 second read
0
0
48

no images were found

“आजच्या डिजिटल युगात ओळखीचा सर्रास गैरवापर होतो.: परिवा प्रणती 

 

सोनी सबवरील ‘वागले की दुनिया’मध्ये मध्यमवर्गीय माणसाच्या दैनंदिन जीवनातील आव्हानांचे, मूल्यांचे आणि त्यांच्या चिवटपणाचे चित्रण असते. जीवनातील चढ-उतारांमधून वागले कुटुंब प्रेक्षकांना कौटुंबिक मूल्ये, प्रामाणिकपणा आणि आशा यांचे महत्त्व जाणवून देते. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना आपलीशी वाटते. आगामी भागांमध्ये, अगदी अनपेक्षित असे काही तरी घडते- साई दर्शन सोसायटीमध्ये पोलीस येतात आणि शेजारी देशासाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून वंदना (परिवा प्रणती)ला अटक करतात. अधिकाऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे, संवेदनशील सरकारी माहिती फुटली असते आणि या बनवाबनवीसाठी जो IP अॅड्रेस वापरलेला असतो, तो वंदनाच्या नावे असतो.प्रेक्षक बघतील की संकट दाट होत जाते. एका अज्ञात विदेशी कंपनीमधून 25 लाख रु. वंदनाच्या खात्यात पाठवले जातात. तिने गुप्त माहिती दिल्याबद्दल तिला आलेली रक्कम असल्याचा संशय यामुळे बळावतो. पोलीस राजेशला (सुमित राघवन) सांगतात की, पुरावा सबळ आहे. वागले कुटुंब या प्रकाराने स्तब्ध होऊन जाते. वागले कुटुंबीय हे काय घडते आहे याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत, तर वंदना सापळ्यात पूर्ण अडकलेली दिसत आहे.

 

सत्य शोधून वागले कुटुंब वंदनाचे निरपराधित्व सिद्ध करू शकेल का?

वंदना वागलेची भूमिका करणारी परिवा प्रणती म्हणते, “आजच्या डिजिटल युगात, सायबर फसवेगिरी आणि ओळखीचा गैरवापर सर्रास होत आहे. वंदनाच्या बाबतीत जे झाले, तो एक सावधानतेचा इशारा आहे. तिला हेरगिरीसारख्या गंभीर आरोपात अडकवण्यासाठी तिच्या नावाचा आणि खात्याचा उपयोग झाला आहे. यावरून लक्षात येईल की आपणा सर्वांनाच किती मोठा धोका आहे. हा मुद्दा आमच्या मालिकेत हाताळत असल्याचा मला अभिमान वाटतो. कारण आपण सर्वांनीच अधिक जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज आहे. अशा बनवाबनवीमुळे निरपराध जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. नागरिक म्हणून सावध राहणे आणि संशयास्पद हालचालीची माहिती शासनास देणे आणि सशक्त सायबर सिक्युरिटी प्रणालीचा आग्रह धरणे ही आपली एकत्रित जबाबदारी आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…