no images were found
शूटिंग सुरू असताना आलेल्या पहिल्या पावसाच्या जादूविषयी सांगत आहे आशी सिंह
पहिला पाऊस नेहमी आनंद आणि जुन्या आठवणी घेऊन येतो. आशी सिंह साठी तर यंदाचा पहिला पाऊस जादुई होता. ही गुणी अभिनेत्री सध्या सोनी सबवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत कैरी या धडाडीच्या वकीलाचे पात्र निभावत आहे. गूढ आणि गंभीर दिसणाऱ्या युग (शब्बीर अहलूवालिया) सोबत तिची पडद्यावरची केमिस्ट्री प्रेक्षकांना आत्ताच आवडू लागली आहे.अलीकडेच आशीने सेटवर असतानाच सीझनच्या पहिल्या पावसाचा अनुभव घेतला- या क्षणामुळे तिचा मूड एकदम इतका मस्त झाला! आणि तो तिच्या व्यक्तिरेखेला देखील साजेसा होता.
त्याविषयी बोलताना आशी म्हणाली, “पहिल्या पावसात काही तरी खूप शुद्ध, निर्मळ असे काही तरी असते. असे वाटते की जणू जगाची गती क्षणभर मंदावली आहे. पहिला पाऊस मला नेहमी माझ्या बालपणात घेऊन जातो. ते स्वच्छंद दिवस, पावसात बागडणे, कागदी होड्या पाण्यात सोडणे आणि चिंब भिजल्याबद्दल आईचा ओरडा खाणे! मुंबईच्या पावसात नक्की काहीतरी जादू आहे. सतत घाईगडबडीत असणाऱ्या माझ्यासारख्या मुलीला हे क्षण थोडा विसावा आणि स्वतःशी संवाद साधण्याची संधी देतात.”
आशी पुढे म्हणते, “यावेळी आम्ही ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ साठी आउटडोर शूटिंग करत होतो. पावसाचे तुषार येऊ लागले त्यामुळे आम्ही काम थांबवले पण मी त्या पहिल्या पावसात भिजलेच. ओल्या मातीचा सुगंध मला फार आवडतो. पावसात आसपासचे जग जणू क्षणभर थांबून जाते. त्यावेळी मला माझ्या कैरी या व्यक्तिरेखेची आठवण झाली. तिला छोट्या छोट्या गोष्टीत सौंदर्य आणि आनंद शोधण्याची सवय आहे. त्यामुळेच तिची व्यक्तिरेखा विशेष आहे. मला चहा, संगीत आणि ओल्या मातीचा सुगंध हे सगळेच प्रिय आहे. आणि हे सगळे जेव्हा शूटिंगच्या दिवशी जुळून आले, तेव्हा फारच मजा आली. हे असे क्षण असतात, जे तुम्हाला पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात.”