Home धार्मिक संविधान समता दिंडी’च्या आडून देवाचे अस्तित्व नाकारणार्‍या अंनिसवाल्यांचा वारीत शिरकाव !

संविधान समता दिंडी’च्या आडून देवाचे अस्तित्व नाकारणार्‍या अंनिसवाल्यांचा वारीत शिरकाव !

24 second read
0
0
37

no images were found

संविधान समता दिंडी’च्या आडून देवाचे अस्तित्व नाकारणार्‍या अंनिसवाल्यांचा वारीत शिरकाव !

 

पुणे – हिंदूंच्या देवता, संत आणि श्रद्धास्थाने यांची सातत्याने निंदानालस्ती करणारे, एवढेच नव्हे, तर देवाचे अस्तित्वच मान्य नसलेल्या अंनिसवाल्यांनी ‘संविधान समता दिंडी’ या गोंडस नावाखाली आषाढी-एकादशी वारीत शिरकाव केला आहे. संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन नाकारले, संत तुकरामगाथा पाण्यावर तरंगल्याचा चमत्कार नाकारणारे अंनिसवाले संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. ही भोंदूगिरी लक्षात येऊ नये, म्हणून हीच नास्तिकतावादी आणि पुरोगामी मंडळी ‘संविधान समता दिंडी’ च्या नावाने वारीत सक्रीय होत आहेत. ‘संविधान समता दिंडी’मध्ये यापूर्वी सहभागी झालेल्या काही जणांवर नक्षली कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे गुन्हेही नोंद झाले आहेत.

         ‘२१ जून ते ६ जुलै २०२५’ या कालावधीत पुणे ते पंढरपूर अशी दिंडीतील सहभागाची ‘संविधान समता दिंडी’ची पत्रिका प्रसारित करण्यात आली आहे. या पत्रिकेवर ‘संयोजक’ म्हणून ज्यांनी नावे दिली आहेत, त्यांतील बहुतेक अंनिसचे कार्यकर्ते आहेत, तर काही अंनिसच्या कार्याशी जोडलेले आहेत. विशेष म्हणजे संविधान समता दिंडीचा प्रसार अंनिसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामाजिक माध्यमांवरून करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी कथित कीर्तनकार बाळकृष्ण वसंत गडकर यांनी कीर्तनात संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठ गमन, तसेच इंद्रयणी नदीत बुडवलेले संत तुकाराम महाराज तरंगल्याविषयी प्रश्न उपस्थित केला. बाळकृष्ण गडकर हे अंनिसशी जोडलेले आहेत.  त्यांच्याप्रमाणेच अंनिसशी जोडलेली आणि स्वत:ला ‘ह.भ.प.’ म्हणवून घेणारी मंडळी संविधान समता दिंडीत सहभागी होऊन संतांचे अभंग सोयीनुसार वापरून नास्तिकतावादाचा अजेंडा राबवत आहेत.  

       हा घ्या नक्षलवाद्यांच्या सहभागाचा पुरावा !

‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या घोषवाक्याच्या आडून  राज्यघटनेतील मूल्यांचा प्रसार करण्यासाठी या उपक्रमात वर्ष २०२२ मध्ये कबीर कला मंच या डाव्या विचारांच्या संघटनेच्या कार्यकर्त्या शीतल साठे सहभागी झाल्या होत्या. दिंडीत शिरून राज्यघटनेच्या मूल्यांच्या गप्पा मारणार्‍या शीतल साठे यांच्यावर वर्ष २०१३ मध्ये ‘अनलॉफुल ॲक्टिविटीज (प्रिवेन्शन) ॲक्ट’ (युएपिए) अंतर्गत माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यामध्ये त्यांचे पती सचिन माळी यांचेही नाव होते. या दोघांनी न्यायालयापुढे आत्मसमर्पण केले होते. या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती.

      अंनिसवाल्यांनीच वारीला अंधश्रद्धा ठरवण्यासाठी केला होता प्रयत्न !

राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असतांना वर्ष २००४ पासून अंनिसचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणण्यासाठी प्रयत्न चालू केले. या कायद्यासाठीचे प्रारूप काँग्रेसने डॉ. दाभोलकर यांच्या साहाय्याने सिद्ध केले. या कायद्याच्या विधेयकामध्ये ‘शारीरिक, आर्थिक आणि मानसिक’ बाधा पोचवणार्‍या कृतीला अंधश्रद्धा ठरवण्याच्या कलमाचा समावेश होता. वारकरी शारिरीक कष्ट घेऊन म्हणजे पायी चालत पंढरपूरला जातात. हे लक्षात घेऊनच अंनिसवाल्यांनी जाणीवपूर्वक या कायद्यात या कलमाचा समावेश केला होता. यामध्ये चमत्कारांनाही अंधश्रद्धा संबोधण्यात आले होते. त्यामुळे संत तुकाराम महाराज यांचे अभंग इंद्रयणीतून वर येणे, संत ज्ञानेश्वर यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवणे आणि भिंत चालवणे हे सर्व अंधश्रद्धेच्या कक्षेत येत होते. त्यामुळे समस्त वारकरी, हिंदु जनजागृती समिती आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी या कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडले. त्यामुळे सरकारला या कायद्यातून ही आक्षेपार्ह कलमे हटवावी लागली होती. या कायद्याच्या माध्यमातून वारकर्‍यांच्या श्रद्धेवर घाला घालण्यात अपयशी ठरलेले हेच अंनिसवाले थेट वारीत शिरून हे काम करण्याचे षंड्यंत्र करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…