Home शासकीय शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घ्या – जिल्हाधिकारी अमोल येडगे

शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घ्या – जिल्हाधिकारी अमोल येडगे

1 min read
0
0
44

no images were found

शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घ्या – जिल्हाधिकारी अमोल येडगे

 

 

 

कोल्हापूर, : कोल्हापूर शहरात वाढत्या वाहतुकीच्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिक्रमण हटविणे, नवीन पार्किंगची सोय करणे, झेब्रा क्रॉसिंग, रोड मार्किंग, ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती, विविध दिशा दर्शक फलक अशा विविध उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित विभागांना दिल्या.

         जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घेण्याचे निर्देशही यावेळी दिले. या बैठकीला महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासह परिवहन विभाग, वाहतूक विभाग, महापालिका, सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

                                                                                                                                                 शहरातील प्रमुख रस्त्यांवरील स्टॅन्ड बोर्ड, छपरी, पायऱ्या, दुकानांपुढील अतिक्रमण तत्काळ काढावे. झेब्रा क्रॉसिंग व रोड साईड पट्टे स्पष्ट करावेत. सिग्नल चौकांवर दिशादर्शक व माहिती फलक लावावेत. शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुट्टीच्या काळात मेन राजाराम हायस्कूल, पेटाळा मैदान, प्रायव्हेट हायस्कूल मैदान व खराडे महाविद्यालय या ठिकाणी ‘पे अँड पार्क’ तत्वावर खासगी पार्किंग सुरु करण्याचे निर्देश दिले. याबाबत शाळांशी बोलून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. दुकानदारांनी आपली व कामगारांची वाहने इतरत्र पार्क करून ग्राहकांच्या वाहनांसाठी जागा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून द्यावी.

       वाहतुकीस अडथळा ठरणारे इलेक्ट्रिक पोल आणि डीपी तातडीने स्थलांतरित करावेत. खुदाई करण्यापूर्वी वाहतूक विभागाची व पोलिस विभागाची परवानगी घेणे बंधनकारक करावे. शहरातील महत्वाच्या व गर्दीच्या सिग्नल चौकात इन्व्हर्टरची सुविधा करावी. (उदा. ताराराणी, दाभोळकर, उमा टॉकीज) अंबाबाई मंदिर परीसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मंदिरा सभोवती तसेच शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याकरीता ट्रॅफिक वॉर्डन नेमावेत अशी सूचना करण्यात आली.

       जुनाराजवाडा पोलीस ठाणे हद्द- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रंकाळा रोड साईड पांढरे पट्टे मारणे, पान लाईन, चप्पल लाईन ते पापाची तिकटी ते गंगावेश ते रंकाळा स्टॅंड ते रंकाळा टॉवर तसेच बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक नो थांबा (No Stopping) करणे. रंकाळा टॉवर ते डी मार्ट या दरम्यान रस्त्याच्या बाजुचा वॉकींग ट्रॅकचे खांब काढून त्याठिकाणी दुचाकी व चार चाकी पार्कींग करणे शक्य आहे का यावर चर्चा झाली.

        महाद्वार रोड व ताराबाई रोड अतिक्रमण, रोड साईड मार्कींग, ताराबाई रोड पी-१,पी-२ पार्कींग इत्यादी बाबत नियोजन करण्यात आले. भवानी मंडप मधील अतिक्रमण व वाहने काढणे, पर्यटकांच्या वाहनाकरीता भवानी मंडप कमानीजवळ ड्रॉपींग पॉईट करणे. शहरातील संपुर्ण रोडवरील दुकानदारांचे पायाड, दुकानावरील छपरी असे अतिक्रमण काढणे. शाळा सुटण्याच्या वेळेचे नियोजन करून त्या भागातील गर्दी टाळण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

       शाहूपुरी पोलीस ठाणे हद्द – ट्रॅव्हल्स बसेस या दाभोळकर सिग्नल ते ताराराणी सिग्नल चौक या  मार्गावर पिकअपसाठी थांबतात. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होते. ट्रॅव्हल्स बसेससाठी ताराराणी पुतळा, पाण्याच्या टाकीजवळ पार्कींग सुविधा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पर्यटकांच्या वाहनाकरीता नव्याने पार्कींग सुरु करणे. तावडे हॉटेल येथील बस स्टॉपची जागा बदलणे, तेथील इलेक्ट्रिक पोल शिफ्ट करणे व सिग्नल सुरु करणे. तावडे हॉटेल येथे वारंवार वाहतुक कोंडी होते त्याठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. सासने मैदान ते आदित्य कॉर्नर पी-१.पी-२ पार्किंग व्यवस्था करणे. ही सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुसूत्र होईल. आणि याबाबत पुढील आठ दिवसात कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. ज्या ठिकाणी नव्याने बदल तसेच सुविधा निर्माण केल्या जात आहेत याविषयक चांगली प्रसिद्धी करून मोहीम स्वरुपात अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…