Home आरोग्य आंतरराष्ट्रीय योग दिनाचे शनिवारी महासैनिक दरबार हॉल येथे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे शनिवारी महासैनिक दरबार हॉल येथे आयोजन

13 second read
0
0
109

no images were found

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे शनिवारी महासैनिक दरबार हॉल येथे आयोजन

 

 

कोल्हापूर, : 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या माध्यमातून व जिल्हा योग संघटनेच्या सहकार्याने महासैनिक दरबार हॉल, कसबा बावडा कोल्हापूर येथे दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता योग दिन साजरा करण्यात येणार आहे. सर्वानी योगासनांकरिता येताना सोयीस्कर पोशाख परिधान करुन यावे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

       शारीरिक व अध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्व विचारात घेऊन प्रतिवर्षी दिनांक 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. यानुसार प्रतिवर्षी दिनांक 21 जून हा दिवस राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. योग दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे.

      कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन.सी. सी, मेरा युवा भारत, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने यांनी सुद्धा आपआपल्या ठिकाणी 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉल नुसार साजरा करावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रोटोकॉल बाबतची सविस्तर माहिती www.ayush.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…