Home Uncategorized डॉ. व्ही.एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कार जाहीर

डॉ. व्ही.एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कार जाहीर

0 second read
0
0
31

no images were found

डॉ. व्ही.एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कार जाहीर

कोल्हापूर,: शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना येथील रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने ‘करवीर भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्लबचे प्रेसिडेंट कुशल पटेल आणि सेक्रेटरी नारायण भोई यांनी ही घोषणा केली आहे.

पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे शैक्षणिक, प्रशासकीय कार्य, विज्ञान लेखनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम आणि जलसंवर्धनविषयक जनजागृतीसाठी त्यांनी चालविलेले कृतीशील उपक्रम या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. येत्या शुक्रवारी (दि. २०) महासंचालक प्रतिनिधी राजूभाई दोशी यांच्या हस्ते आणि सहाय्यक गव्हर्नर गिरीष जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत चार्टर नाईट समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ताराबाई पार्क येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये हा समारंभ होईल.

डॉ. शिंदे हे गेली अनेक वर्षे विज्ञान लेखनाच्या माध्यमातून वैज्ञानिक प्रसार व जागृतीचे कार्य करीत आहेत. एककांचे मानकरी, हिरव्या बोटांचे किमयागार, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया, एककांचे इतर मानकरी, कृषीक्रांतीचे शिलेदार आणि भावणारी झाडे ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. त्यासाठी डॉ. शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा महात्मा जोतीराव फुले पुरस्कार, इंडियन फिजिक्स असोसिएशन (पुणे) यांचा मो.वा. चिपळोणकर पुरस्कार, मराठी विज्ञान परिषदेचा सुधाकर आठले पुरस्कार, मिरजेच्या चैतन्य शब्दांगण संस्थेचा कै. अशोक कोरे स्मृती पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा कृ.गो. सूर्यवंशी पुरस्कार, एन्वायर्नमेंट कॉन्झर्वेशन अँड रिसर्च ऑर्गनायझेशनचा वसुंधरा पुरस्कार तसेच किर्लोस्कर समूहाचा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान पुरस्कार मिळाले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…