Home आरोग्य डेटॉल फ्रेश भारतीयांना 12 तास ताजेपणा देऊन ‘नेहमीच तयार’ रहाण्यासाठी देते प्रोत्साहन

डेटॉल फ्रेश भारतीयांना 12 तास ताजेपणा देऊन ‘नेहमीच तयार’ रहाण्यासाठी देते प्रोत्साहन

30 second read
0
0
9

no images were found

डेटॉल फ्रेश भारतीयांना 12 तास ताजेपणा देऊन ‘नेहमीच तयार’ रहाण्यासाठी देते प्रोत्साहन

 

भारतातील सर्वात विश्वासार्ह स्वच्छता ब्रँडपैकी एक असलेल्या डेटॉलने त्यांच्या प्रसिद्ध कोलोन फ्रेश~ आणि लाइम फ्रेश साबण प्रकारांमध्ये 12 तासांचा ताजेपणा~* देऊन वैयक्तिक काळजी घेण्याची वचनबद्धता वाढवली आहे. ही ऑफर वाढत्या ग्राहकांच्या गरजा – म्हणजेच तुम्ही सुरक्षित आहात आणि दिवसभर ताजेतवाने वाटत आहात हे समजल्यावर येणारा आत्मविश्वास तुम्हाला देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

लांब प्रवासादरम्यान, कामावर किंवा जास्त वेळ सामाजिक संवादापूर्वी कधीही अनपेक्षितपणे शरीराची दुर्गंधी येऊ शकते – ज्यामुळे लोकांना अस्वस्थ वाटू शकते, संकोच किंवा अगदी लाज वाटू शकते. डेटॉल फ्रेश 99.9% दुर्गंधी निर्माण करणारे जंतू^ काढून टाकून आणि तुम्हाला 12 तास~* ताजेपणा देते तसेच ही दररोजची अस्वस्थता दूर करते, जेणेकरून लोकं आत्मविश्वासाने आणि कोणत्याही संधीचा फायदा घेण्यास तयार असतील.

       डेटॉल कोलोन फ्रेशसह, वापरकर्त्यांना एक आत्मविश्वासी, उत्साहवर्धक कस्तुरी कोलोन सुगंध मिळतो जो तुम्हाला आंघोळीनंतर ताजेपणा देतो, तर डेटॉल लाइम फ्रेश एक उत्साही लिंबूवर्गीय सुगंध देतो ज्यामुळे ऊर्जावान आणि उत्साही वाटू लागते, जेणेकरून तुम्ही ही साबण तुमच्या सामाजिक कार्यात जाण्यासाठी आणि दैनंदिन कामासाठी वापरू शकता. वापरकर्त्यांना त्यांचे पाऊल पुढे टाकण्यास मदत करणारा एक दैनंदिन सहयोगी म्हणजे डेटॉल फ्रेश आहे – म्हणून ते स्वतःबद्दलच्या शंकांमुळे कधीही संधी गमवत नाहीत.

        रेकिट – साऊथ आशियाच्या आरोग्य विभागाचे विभागीय विपणन संचालक कनिका कालरा म्हणाले, “रेकिटमध्ये, आमचा विश्वास आहे की, आपल्यात ताजेपणा असला आणि सुरक्षित वाटले तरच आपल्याला खरा आत्मविश्वास जाणवतो आणि आपण कोणत्याही गोष्टीसाठी तयार असतो. डेटॉल कोलोन आणि लाईम फ्रेश देऊन, आम्ही फक्त ताजेपणाच देत नाही तर – आम्ही लोकांना आत्मविश्वासाचा अनुभव सुद्धा देतो. तुम्ही बोर्डरूममध्ये किंवा स्टेजवर स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करत असाल  पाठलाग करत असाल, तेव्हा 12 तासांचा ताजेपणा*~ तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी आत्मविश्वास देतो. डेटॉलकडून हा एक आकर्षक फायदा आहे कारण आम्ही ताजेपणा देऊन सोबतच संरक्षण सुद्धा देण्याचे वचन पूर्ण करतो –  कारण जेव्हा तुम्हाला ताजेपणा जाणवतो, तेव्हा तुम्ही नेहमीच कशाही साठी तयार असता.”

       ही मोहीम दोन कार्यरत ऍड फिल्मने चालवली आहे, तिची संकल्पना मॅककॅन वर्ल्डग्रुपची आहे. यावेळी, मॅककॅन वर्ल्डग्रुप इंडियाचे मुख्य क्रिएटीव्ह अधिकारी आणि CEO प्रसून जोशी म्हणाले, “संधी वाट बघत नाहीत – त्या कोणत्याही वेळी येऊ शकतात! आणि जेव्हा त्या येतात तेव्हा तुम्हाला त्या स्वीकारण्यासाठी ताजेपणा, आत्मविश्वास वाटायला हवा. हाच या मोहीमेचा उद्देश्य आहे. 12 तासांच्या ताजेपणासह~*, डेटॉल लाइम फ्रेश आणि कोलोन फ्रेश तुमच्या सोबत आहेत, ज्यामुळे सतत बाहेर फिरणाऱ्यांना ताजेपणा आणि आत्मविश्वास जाणवतो आणि शरीराच्या दुर्गंधापासून देखील संरक्षण मिळते^.”  

      डेटॉल लाईम फ्रेश या TVC मध्ये, विमानतळावर त्यांच्या स्टार्टअप कल्पना सादर करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणी एका संभाव्य गुंतवणूकदाराला भेटतात – परंतु डेटॉल वापरण्यास तयार असलेली आणि ताजेपणा वाटणारी व्यक्तीच यात सहभागी होते. कोलोन फ्रेश या फिल्ममध्ये, एका नाईट क्लबमधील काही इच्छुक संगीतकारांना सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाते – आणि पुन्हा, डेटॉलचा ताजेपणाच एखाद्याला चर्चेत येण्याचा आत्मविश्वास देतो.

       या सुधारित वचनबद्धतेसह, डेटॉल भारतीयांच्या जीवनासोबतच विकसित होत आहे – त्यांना केवळ जंतूंपासून संरक्षित राहण्यासच मदत करत नाही तर प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी आत्मविश्वास अनुभवण्यास देखील मदत करतो. कारण जेव्हा तुम्हाला ताजेपणा वाटतो तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास सुद्धा वाटतो. आणि जेव्हा तुम्हाला आत्मविश्वास वाटतो तेव्हा तुम्ही नेहमीच तयार राहू शकता.

 

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डेंग्यूविरुद्ध जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम; जिल्हाधिकाऱ्यांचे डासोत्पत्ती रोखण्याचे निर्देश

डेंग्यूविरुद्ध जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम; जिल्हाधिकाऱ्यांचे डासोत्पत्ती रोखण्याचे नि…