no images were found
खरगे झाले काँग्रेसचे नवे अध्यक्ष
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठ्या फरकाने थरूर यांचा पराभव केला आहे. तर निवडणुकीत ४१६ मतं बाद करण्यात आली आहेत. शशी थरूर यांनी खरगे यांचे अभिनंदन केले आहे. मल्लिकार्जुन खरगे हे निवडणूक जिंकणार असा दावा निवडणुकीपूर्वीपासूनच केला जात होता. खरगे हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते आहेत.
८० वर्षांचे खरगे हे कर्नाटकातील आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा आधीच राजीनामा दिला आहे. निवडणुकीत ७ हजार ८९७ मतं मिळवून खरगे विजयी झाले. तर थरूर यांना १ हजार ७२ मतं मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेल्या २४ वर्षांमध्ये प्रथमच झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी ९६ टक्के मतदान झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदाची सरळ लढत होती. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? हे आज झालेल्या मतमोजणीअंती स्पष्ट झाले.
गेल्या सात आठवड्यांपासून हा चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीत देशातील ३६ केंद्रे आणि ६८ मतदान केंद्रांवर सकाळी १०पासून सायंकाळी ४ पर्यंत ९ हजार ९१५ पैकी ९५०० हून अधिक प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला होता. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींसह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा, राहुल गांधी, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, प्रचार विभागाचे प्रमुख जयराम रमेश आणि अजय माकन यांनी आणि इतर प्रमुख नेत्यांनी मतदान केले.
काँग्रेस पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी झालेली ही सहावी निवडणूक
यापूर्वी, १९३९, १९५०, १९७७, १९९७ आणि २०००मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुका
स्वातंत्र्योत्तर काळात १९७७ साली काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पहिल्यांदा निवडणूक झाली. यात के. ब्रह्मानंद रेड्डी यांच्याकडून सिद्धार्थ शंकर रे आणि डॉ. करण सिंह यांचा पराभव झाला होता.
१९९७ साली सीताराम केसरी यांचा शरद पवार व राजेश पायलट यांच्यावर विजय मिळविला होता. २०००मध्ये सोनिया गांधी यांच्या उमेदवारीला जितीन प्रसाद यांचे आव्हान दिले होते,
मल्लिकार्जुन खरगे यांचा अल्पपरिचय—
मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म १२ जुलै १९४२ चा आहे. विद्यार्थी संघटनेचा नेता आणि मग राजकारणात प्रवेश केला . काँग्रेस पक्षातील एक मोठा दलित चेहरा कर्नाटकातील मजुरांच्या हक्काची लढाई आंदोलनांचे नेतृत्व केले.
१९७२ मध्ये पहिल्यांदाच आमदार झाले.
२००८ पर्यंत सतत ९ वेळा आमदार म्हणून विधिमंडळात निवडून गेले. २००९ आणि २०१४ असे दोन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडणून गेले. मनमोहनसिंह सरकारमध्ये श्रममंत्री होते .ते उत्कृष्ट कबड्डी आणि फुटबॉल खेळाडू होते. चांगले वक्ते, लोकसभा आणि राज्यसभेत दमदार भाषण करण्याची क्षमता आहे. .