
no images were found
सावित्रीबाई फुले रुग्णालयातील दोन्ही ऑपरेशन थिएटर र्निजंतूकीकरणासाठी सहा दिवस बंद
कोल्हापूर (प्रतिनिधी):- महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडील सर्जिकल विभागातील जनरल ऑपरेशन थिएटर व ऑर्थो ऑपरेश थिएटरचे र्निजंतूकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम शनिवार, दि.31 मे 2025 ते दि. 5 जून 2025 पर्यंत सहा दिवस करण्यात येणार आहे. तसेच स्वॅबचा रिपोर्ट येईपर्यंत या कालावधीत हा विभाग बंद राहणार आहे. तरी या सहा दिवसाच्या कालावधीत संबंधीत नागरीकांनी वरिष्ठ रुग्णालय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे रुग्णसेवेचा लाभा घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.