Home आरोग्य दक्षिण गोव्‍यामध्‍ये जागतिक दर्जाची डायलिसिस केअर सेवा 

दक्षिण गोव्‍यामध्‍ये जागतिक दर्जाची डायलिसिस केअर सेवा 

3 min read
0
0
9

no images were found

दक्षिण गोव्‍यामध्‍ये जागतिक दर्जाची डायलिसिस केअर सेवा 

 

मुबई, : अपोलो डायलिसिस प्रा. लि. ही अपोलो हेल्‍थ अँड लाइफस्‍टाइल लिमिटेडची उपकंपनी आणि डायलिसिस सेवांमधील अग्रगण्‍य कंपनीने एसएमआरसी हॉस्पिटल (साळगावकर मेडिकल रिसर्च सेंटर), चिकालिम, गोवा येथे नवीन डायलिसिस युनिट लाँच केले आहे. हे नवीन युनिट मूत्रपिंड निकामी झालेल्या व्यक्‍तींना उत्तम रुग्णसेवा प्रदान करण्यासाठी सुसज्ज आहे आणि हॉस्पिटल परिसरामध्‍ये प्रगत तंत्रज्ञानासह डिझाइन करण्‍यात आले आहे. या युनिटमध्‍ये अनुभवी नेफ्रोलॉजिस्ट्स आणि प्रशिक्षित डायलिसिस टेक्निशियन्‍स आहेत.  

अपोलो डायलिसिस क्लिनिक्‍स प्रगत तंत्रज्ञान आणि उत्तम केअरच्‍या माध्‍यमातून जागतिक दर्जाच्‍या डायलिसिस सेवा देतात. कुशल नेफ्रेालॉजिस्‍ट्स आणि आरोग्‍यसेवा व्‍यावसायिकांची समर्पित टीम शुद्ध, आरामदायी व रूग्‍ण-केंद्रित वातावरणामध्‍ये तज्ञ केअर देते. डायलिसिस उपचारांसाठी डीडीएसएसवाय (दीनदयाळ स्‍वास्‍थ्‍य सेवा योजना) कव्‍हरेजसह केअर क्लिनिक पात्र रूग्‍णांना किफायतशीरपणाची खात्री देते.

अपोलो डायलिसिस क्लिनिक्‍स आणि एसएमआरसीएचच्‍या नफ्रोलॉजिस्‍ट डॉ. सिंधू मलिक अर्जुन म्‍हणाल्‍या, “अंतिम टप्‍प्‍यातील मूत्रपिंड आजार अशा मूत्रपिंड आजारांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये त्‍वरित व सर्वसमावेशक केअरची गरज ओळखत रूग्‍णांसाठी सानुकूल निष्‍पत्तींची खात्री घेण्‍यासाठी आवश्‍यक आहे. वेळेवर हस्‍तक्षेप केल्‍यास मूत्रपिंडाच्‍या कार्यामध्‍ये अधिक अडथळा येण्‍याला प्रतिबंध होऊ शकतो, तसेच उत्तमरित्‍या सुसज्‍ज असलेले डायलिसिस युनिट हेमोडायलिसिस किंवा पेरिटोनियल डायलिसिस यांसारखे जीवनदायी उपचार देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. केअर देण्‍यामध्‍ये तत्‍परता व सर्वसमावेशकतेला प्राधान्‍य देत अंतिम टप्‍प्‍यातील मूत्रपिंड आजाराने पीडित व्‍यक्‍तींसाठी जीवनाचा दर्जा आणि निष्‍पत्तींमध्‍ये सुधारणा करता येऊ शकते.”

याप्रसंगी अपोलो डायलिसिस क्लिनिक्‍सचे सीओओ श्री. एम. सुधाकर राव यांनी एसएमआरसी हॉस्पिटल, गोवा येथे त्‍यांच्‍या १६०व्‍या क्लिनिकच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. ते म्‍हणाले की, भारतभरात उच्‍च दर्जाची मूत्रपिंड केअर देवा अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍यासाठी अपोलो डायलिसिसच्‍या मिशनमधील हे महत्त्वाचे पाऊल आहे.

श्री. राव म्‍हणाले की, हे नवीन युनिट (डीडीएसएसवाय) अंतर्गत कार्यरत असेल, ज्‍यामधून येथील रूग्‍णांना किफायतशीर व वेळेवर डायलिसिस सेवा मिळतील.

“हे नवीन सेंटर अपोलो डायलिसिस क्लिनिक्‍ससाठी प्रगतीच्‍या दिशेने घेऊन जाण्‍यासोबत सर्वांना समान आरोग्‍यसेवा उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या ध्‍येयाच्‍या जवळ नेते. डीडीएसएसवाय अंतर्गत सेवा देत आमचा मूत्रपिंड आजाराने पीडित सर्व रूग्‍णांना केअर देण्‍याचा मनसुबा आहे,” असे श्री. राव पुढे म्‍हणाले. प्रथम व द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये अपोलो डायलिसिस क्लिनिक्‍सच्‍या स्थिर विस्‍तारीकरणामधून सर्वोत्तम उपचारासोबत दयाळूभाव, निष्‍ठा व रूग्‍ण-केंद्रित दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून केअर सेवा देण्‍याप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते.

एसएमआरसी गोवा क्लिनिक येथे आणखी एक महत्त्वपूर्ण टप्‍पा म्‍हणजे हॉलिडे डायलिसिसचे लाँच. ही अद्वितीय ऑफरिंग नियमितपणे डायलिसिस करणाऱ्या रूग्‍णांना त्‍यांच्‍या उपचारामध्‍ये अडथळा न आणता प्रवास करण्‍याची सेवा देते, ज्‍यामुळे गोव्‍याला भेट देणाऱ्या अभ्‍यागतांना त्‍यांचे डायलिसिस केअर सुरू ठेवण्‍यासाठी सत्रांचे आगाऊ बुकिंग करता येते आणि राज्‍यामध्‍ये उत्‍साहपूर्ण क्षणांचा आनंद घेता येतो. अपोलो आणि एसएमआरसी यांच्‍या या उपक्रमामधून रूग्‍ण अनुभव उत्‍साहित करण्‍यासाठी आणि मूत्रपिंड आजाराने पीडित व्‍यक्‍तींकरिता जीवनाचा दर्जा सर्वोत्तम करण्‍यासाठी समान दृष्टिकोन दिसून येतो.

एसएमआरसी हॉस्पिटलचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक म्‍हणाले, “आम्‍हाला एसएमआरसी हॉस्पिटल येथे दर्जात्‍मक किडनी केअर आणि उपचार सोईस्‍करपणे उपलब्‍ध करून देण्‍यासाठी अपोलो डायलिसिस क्लिनिक्‍ससोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही किफायतशीर व उच्‍च दर्जाच्‍या आरोग्‍यसेवा देत रूग्‍णांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमचा गोव्‍यामधील स्‍थानिक निवासी आणि अभ्‍यागतांना सेवा देण्‍याचा मनसुबा आहे.”

ते पुढे म्‍हणाले, “हे डायलिसिस क्लिनिक जनतेसाठी खुले आहे आणि डीडीएसएसवाय सारख्या सरकारी योजनांअंतर्गत सेवा देते, ज्यामुळे ते सर्वांसाठी सहजसाध्य आणि परवडणारे आहे. आम्ही नियमित डायलिसिसची आवश्यकता असलेल्या रुग्णांना नोंदणी करण्यास आणि आमच्या सुविधेत प्रदान केलेल्या तज्ञांच्या सेवेचा लाभ घेण्यास आवाहन करतो. या समर्पित डायलिसिस युनिटद्वारे आम्ही आणखी अनेक रुग्णांना सेवा देण्यास उत्सुक आहोत.”  

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

60 फुटी बुमद्वारे एक हजार टन गाळ एका दिवसात उठाव

60 फुटी बुमद्वारे एक हजार टन गाळ एका दिवसात उठाव कोल्हापूर (प्रतिनिधी):- शहरामध्ये पावसाने…