
no images were found
न्यू निस्सान मॅग्नाइट आता सीएनजी रिट्रोफिटमेंट किटसह उपलब्ध
· सीएनजी रिट्रोफिटमेंट किट ७४९९९ रूपये अतिरिक्त किमतीत उपलब्ध होणार
· सीएनजी पर्यायामुळे पारंपरिक इंधनांना अधिक स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही पर्याय उपलब्ध आणि अधिक इंधन कार्यक्षमता
· सीएजी पर्याय एक मानक रिट्रोफिटमेंटसह येणार असून त्यात ३ वर्षे किंवा १ लाख किमीची वॉरंटी असेल
गुरूग्राम, : – निस्सान मोटर इंडियाची लोकप्रिय एसयूव्ही न्यू निस्सान मॅग्नाइट आता सरकार-मान्यताप्राप्त सीएनजी रेट्रोफिटमेंट किटसह उपलब्ध असेल. सीएनजी किट देशाच्या नियामक मानकांनुसार मोटोझेन (तृतीय पक्ष) द्वारे पूर्णपणे विकसित, उत्पादित आणि गुणवत्ता हमीसह असेल. मोटोझेन किटमधील घटकांसाठी वॉरंटी देईल. या उपक्रमातून ग्राहक-केंद्रित उपाययोजना प्रदान करण्यावर भर दिला जाईल. या किट्सचे फिटिंग सरकारी मान्यताप्राप्त फिटमेंट केंद्रांवर केले जाईल. संपूर्ण रेट्रोफिटमेंट फक्त ७४,९९९ रुपयांच्या स्पर्धात्मक अतिरिक्त किमतीत उपलब्ध असेल.
शाश्वततेबद्दल आणि पर्यावरणाविषयी जागरूक ग्राहकांसाठी या पर्यावरणपूरक सीएनजी किट फिटमेंटची अंमलबजावणी देशभरात टप्प्याटप्प्याने केली जाईल. पहिल्या टप्प्यात निस्सानचे ग्राहक दिल्ली-एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि कर्नाटक या ७ राज्यांमधील निस्सान अधिकृत डीलरशिपद्वारे सीएनजी किट बसवून घेऊ शकतात. दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून नंतर ते देशभरातील इतर राज्यांमध्ये विस्तारित केले जाईल.
सीएनजी किट पर्याय फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या नवीन निस्सान मॅग्नाइट १.० लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसाठी उपलब्ध आहे. सीएनजी रेट्रोफिटेड किटमुळे ग्राहकांना इंधन बचतीचा फायदा होईल. सर्व सीएनजी किट्स सरकारी मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडून रेट्रोफिट केले जातील. त्यात ग्राहकांना सध्याच्या स्थानिक नियमांचे आणि सुरक्षा मानकांचे पालन करणारे प्रमाणित होमोलोगेटेड किट दिले जाईल.
निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सौरभ वत्स म्हणाले:“न्यू निस्सान मॅग्नाइट हे आमच्यासाठी एक अभूतपूर्व उत्पादन आहे आणि त्याने भारतात आमच्या यशाचे नेतृत्व केले आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निस्सान डीलर्स सरकार-मान्यताप्राप्त सीएनजी रेट्रोफिटमेंट किटच्या स्वरूपात पर्यायी इंधन पर्याय देतील. ते ग्राहकांसाठी अधिकृत फिटमेंट केंद्रांवर फिट केले जाईल. आम्हाला खात्री आहे की यामुळे लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे मूल्य आणि व्यावहारिकता वाढेल.”न्यू मॅग्नाइट एसयूव्हीची बोल्ड आणि स्टायलिश डिझाइन, २०+ पहिली आणि सर्वोत्तम श्रेणीतील वैशिष्ट्ये आणि ५५+ सुरक्षा वैशिष्ट्ये यामुळे ती कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक वेगळी निवड ठरते. रस्त्यांवरील ठळक उपस्थिती, प्रीमियम वैशिष्ट्ये आणि वाढत्या जागतिक व्याप्तीसह न्यू निस्सान मॅग्नाइट आता ६५ हून अधिक उजव्या हाताने ड्राइव्ह आणि डाव्या हाताने ड्राइव्ह अशा दोन्ही बाजारपेठा असलेल्या देशांमध्ये उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या www.nissan.in.