Home व्यापार इसुझू डी-मॅक्स एस-कॅबसाठी इसुझू मोटर्स इंडियातर्फे आकर्षक लीजिंग सुविधा; व्यावसायिक वाहन खरेदीसाठी अधिक स्मार्ट पर्याय

इसुझू डी-मॅक्स एस-कॅबसाठी इसुझू मोटर्स इंडियातर्फे आकर्षक लीजिंग सुविधा; व्यावसायिक वाहन खरेदीसाठी अधिक स्मार्ट पर्याय

56 second read
0
0
16

no images were found

इसुझू डी-मॅक्स एस-कॅबसाठी इसुझू मोटर्स इंडियातर्फे आकर्षक लीजिंग सुविधाव्यावसायिक वाहन खरेदीसाठी अधिक स्मार्ट पर्याय

–       सर्वसमावेशक मासिक खर्च रु. 38,999 पासून सुरू होणारी विना अडथळा लीजिंग सुविधा
–       ग्राहकांना रु.1.81 लाखांपर्यंत बचतीची संधी*
–       व्यवसाय मालक आणि फ्लीट ऑपरेटर्सच्या गरजा लक्षात घेऊन केलेली रचना

      इसुझू मोटर्स लिमिटेडची उपकंपनी आणि भारतातील आघाडीच्या व्यावसायिक वाहन निर्यातदारांपैकी एक असलेल्या इसुझू मोटर्स इंडियाने आज इसुझू डी-मॅक्स एस-कॅबसाठी नवीन लीजिंग मॉडेलची घोषणा केली. भारतात वाहन लीजिंग हा पर्याय विविध व्यवसायांसाठी वेगाने लोकप्रिय होत असताना, वाहन मालकीच्या जबाबदाऱ्यांशिवाय व्यावसायिक वाहनांचा अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर वापर करता यावा, या उद्देशाने ही सुविधा सादर करण्यात आली आहे. विविध व्यावसायिक वापरांमध्ये टिकाऊपणा, विश्वासार्हता, परफॉर्मन्स आणि बहुउपयोगितेसाठी ओळखल्या जाणाऱ्या इसुझू डी-मॅक्स एस-कॅबवर या उपक्रमाचा विशेष भर देण्यात आला आहे.

      हे लीजिंग मॉडेल अधिक कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय म्हणून तयार करण्यात आले आहे. यामुळे व्यवसाय आणि फ्लीट ऑपरेटर्सना ठरावीक कालावधीसाठी वाहन वापरण्याची सुविधा मिळणार असून, मोठी प्रारंभिक गुंतवणूक, वाहनाचे मूल्य कमी होणे किंवा पुनर्विक्रीशी संबंधित अनिश्चितता यांसारख्या चिंता दूर होण्यास मदत होणार आहे.

     ग्राहकांना वाहन वापरण्याचा अधिक सोपा आणि सुलभ पर्याय उपलब्ध करून देणे, तसेच कॅश फ्लोचे अधिक चांगले नियोजन, निश्चित स्वरूपातील ऑपरेटिंगचा खर्च आणि आधुनिक, विश्वासार्ह तसेच नियमांनुसार चालणाऱ्या वाहन ताफ्याचे व्यवस्थापन सुलभ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. लीजिंग सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत* :

  • आकर्षक मासिक भाडे रु.38,999 पासून
  • 4 वर्षांचा निश्चित कालावधी
  • डाउन पेमेंटची गरज नाही
  • अतिरिक्त सर्व्हिस खर्च नाही
  • इन्श्युरन्स किंवा नोंदणीचा खर्च नाही
  • पारंपरिक वित्तपुरवठा मॉडेलच्या तुलनेत अधिक बचत

(*अटी व शर्ती लागू)

पारंपरिक वित्तीय मॉडेलऐवजी लीजिंग पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना INR 1.81 लाखांपर्यंत बचत होऊ शकते. यामुळे व्यवसायांना देखभालीचा भार कमी करणे, भांडवली मर्यादांशिवाय व्यवसाय विस्तार करणे, वाहने अधिक वेगाने तैनात करणे, कार्यक्षमतेत वाढ करणे आणि अधिक आत्मविश्वासाने व्यवसाय वाढवणे शक्य होणार आहे.

      या घोषणेबाबत इसुझू मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश मित्तल म्हणाले“जगभरातील विविध बाजारपेठांमध्ये व्यवसायांना सक्षम करणारी विश्वासार्ह, टिकाऊ आणि कार्यक्षम व्यावसायिक वाहने पुरवण्याची भक्कम ओळख इसुझूने निर्माण केली आहे. जागतिक स्तरावर विश्वासार्ह ब्रँड म्हणून भारतातील आमची उपस्थिती आम्ही सातत्याने अधिक मजबूत करत आहोत आणि भारतीय बाजारपेठ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन लीजिंग सुविधेच्या माध्यमातून जपानी गुणवत्ता आणि टिकाऊपणासाठी ओळखली जाणारी इसुझू व्यावसायिक वाहने उद्योजकांसाठी अधिक सहज उपलब्ध आणि आर्थिकदृष्ट्या अधिक कार्यक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

      इसुझू मोटर्स इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक ताकेशी हिरानो म्हणाले, “इसुझू डी-मॅक्स एस-कॅबसाठी नवीन लीजिंग मॉडेल सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांसाठी व्यावसायिक वाहनांचा वापर अधिक सुलभ आणि सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. उत्कृष्ट बांधणी आणि विश्वासार्हतेच्या जोरावर इसुझू डी-मॅक्स एस-कॅबने व्यावसायिक वाहन क्षेत्रात सातत्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध प्रकारच्या वापरांमध्ये मोठे उद्योग आणि फ्लीट ऑपरेटर्ससाठी हे वाहन यशाचे महत्त्वाचे साधन ठरले आहे. या नवीन लीजिंग प्रस्तावाद्वारे आम्ही ग्राहकांसाठी विश्वासार्ह एस-कॅब मिळवण्याचा अधिक स्मार्ट, लवचिक आणि सोपा पर्याय सादर करत आहोत. वाहन मालकी आणि मोठ्या प्रारंभिक गुंतवणुकीशी संबंधित पारंपरिक अडथळे दूर करून, व्यवसायांना पहिल्याच दिवसापासून अधिक आर्थिक कार्यक्षमता आणि कामकाजातील लवचिकतेसह प्रगती करण्यास मदत होणार आहे.”

     इसुझू डी-मॅक्स एस-कॅबमध्ये विश्वासार्ह 2.5L व्हीजीटी इंटरकूल्ड डिझेल इंजिन देण्यात आले असून, ते परिष्कृत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत उपलब्ध आहे. त्यामुळे उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि इंधन कार्यक्षमता मिळते. वाहनाच्या बाह्य रचनेत एअरोडायनॅमिक डिझाइन, उच्च क्षमतेचे स्टील बॉडी स्ट्रक्चर, मोठी कार्गो जागा, टिकाऊ सस्पेन्शन आणि अधिक भार वाहून नेण्याची क्षमता देणारी रचना देण्यात आली आहे. वाहनाच्या आतील भागात अधिक आरामदायी केबिन, 6 प्रकारे समायोजित करता येणारी चालक सीट, मागील सीटचा सुधारित कोन, धूळ व परागकण फिल्टरसह एसी, विविध स्टोरेज स्पेसेस आणि अधिक सोयीसाठी मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले देण्यात आला आहे.

      हा उपक्रम ग्राहकांसाठी व्यवसायातील कार्यक्षमता वाढवणे आणि दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याच्या इसुझूच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देणारा आहे. वाहन मालकीशी संबंधित अडथळे कमी करत आणि आर्थिक लवचिकता वाढवत, हे लीजिंग मॉडेल ग्राहकांना व्यवसायाचा विस्तार अधिक सुलभपणे करण्यास आणि व्यवसाय वाढीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करणार आहे. इसुझूच्या जागतिक स्तरावर विश्वासार्ह उत्पादनांच्या पाठबळामुळे ग्राहकांना अधिक आत्मविश्वासाने पुढे जात व्यवसाय वृद्धीचा वेग वाढवता येणार आहे.अधिक माहितीसाठी इच्छुक ग्राहकांनी जवळच्या इसुझू डीलरशिपशी संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In व्यापार
Comments are closed.

Check Also

सीएसआर’ निधीच्या उपयोगातून महाराष्ट्रात प्रगतीचा नवा अध्याय – मुख्यमंत्री : टेक महा इम्पॅक्ट परिषदेचे आयोजन

सीएसआर’ निधीच्या उपयोगातून महाराष्ट्रात प्रगतीचा नवा अध्याय – मुख्यमंत्री…