
no images were found
शहरामध्ये विविध ठिकाणच्या चॅनलची सफाई
कोल्हापूर (प्रतिनिधी):- शहरातील विविध ठिकाणच्या चॅनलमधून आज आरोग्य विभागाच्यावतीने खरमाती व इतर कचरा सफाई कर्मचारी मार्फत चॅनेलमधून काढण्यात आला. स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज स्वामी विवेकानंद कॉलेज परिसर, दुधाळी परिसर, पंचगंगा नदीरोड, नागाळा पार्क, वारणा कॉलनी, आरटीओ कार्यालय, कल्याण ज्वेलर्स याठिकाणी असलेल्या नाले, क्रॉसड्रेन व चॅनलची सफाई करण्यात आली. या चॅनलमधून खरमाती, प्लॅस्टीक व इतर कचरा मोठया प्रमाणात साचला होता. महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या व जेसीबीच्या सहाय्याने हे चॅनल साफ करण्यात आले.