
no images were found
भारतीय सैन्यदलाच्या सन्मानार्थ कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने तिरंगा पदयात्रा संपन्न…
कोल्हापूर (प्रतिनिधी ):-गेल्या महिन्यात जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी शौर्य गाजवत पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले. या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने आज कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेबांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या रॅली दरम्यान उपस्थित शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम पाकिस्तान ला नामोहरम करणाऱ्या भारतीय सैन्याचा विजय असो, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी पहलगाम सारख्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देऊन भारतीय सैन्याने शौर्य आणि पराक्रम याचे अनोखे दर्शन संपूर्ण जगाला दाखवले असून पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे, भविष्यात असा भ्याड हल्ला पुन्हा करण्याचा प्रयत्न झाल्यास सैन्य दलाकडून जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, तसेच गरज पडल्यास प्रत्येक शिवसैनिक सीमेवरती जाऊन पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले…
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, गौरी माळदकर, पूजा पाटील, सुनिता भोपळे, पूजा कामते, शिवसेना उप जिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाटगे, सुनील खोत, राहुल चव्हाण, कमलाकर जगदाळे, अश्विन शेळके, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, पियुष चव्हाण, कुणाल शिंदे, अविनाश कामते, दादू शिंदे, सौरभ कुलकर्णी, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, राजेंद्र जाधव, सचिन पाटील, कपिल नाळे, तन्वीर बेपारी, योगेश चौगले, कपिल सरनाईक, शुभम शिंदे, श्रीकांत मंडलिक, रिक्षासेना शहरप्रमुख राजू पवार, आसिफ मुल्लांनी, मंगेश चितारे, यशवंत माळकर, प्रदीप मोहिते, अजिंक्य शिदृक आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.