Home राजकीय जळगावात पत्नी महापौर, तर पती विरोधी पक्षनेता

जळगावात पत्नी महापौर, तर पती विरोधी पक्षनेता

0 second read
0
0
61

no images were found

जळगावात पत्नी महापौर, तर पती विरोधी पक्षनेता

जळगाव :  दीड वर्षापासून जळगाव महापालिकेत पत्नी महापौर व पती विरोधी पक्षनेता असल्याने जळगाव महापालिका लोकशाहीतील वेगळे उदाहरण ठरली आहे. अशी ही एकमेव घटना असावी, असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे. जळगाव महापालिकेत सध्या शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर असून, त्यांचे पती सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते आहेत.

जळगाव महापालिका कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. तत्कालीन नगरपालिकेत झालेला कोट्यवधी जळगाव महापालिका आता एका नव्या प्रकरणाने चर्चेत आली आहे.  सध्या महापालिकेत आज तीन पक्षांचे सदस्य असतानादेखील दीड वर्षापासून महापौर व विरोधी पक्षनेतेपद एकाच पक्षाकडे आहे. सन २०१८मध्ये महापालिका निवडणुकीत भाजपने ७५ पैकी ५७ जागा मिळवून सत्ता मिळवली. त्या वेळी शिवसेनेला १५, तर ‘एमआयएम’ला तीन जागा मिळाल्या. त्या वेळी भाजपचा महापौर झाला, तर शिवसेनेकडून सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते झाले. अडीच वर्षांनंतर मार्च २०२१मध्ये महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याने सत्तांतर होऊन जळगाव महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन या महापौरपदी विराजमान झाल्या, तर भाजपच्या बंडखोरांपैकी कुलभूषण पाटील यांची उपमहापौरपदी वर्णी लागली.

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडामुळे जळगाव शिवसेनेतील २७ बंडखोरांपैकी १२ जण पुन्हा भाजपकडे गेले. त्यामुळे शिवसेनेकडे बहुमत नसतानाही आज महापौर व विरोधी पक्षनेता दोन्ही पदे सेनेकडेच आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा 

  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा     …