
no images were found
जत साधू मारहाण प्रकरणी ६ जणांना अटक
जत : लवंगा येथे उत्तर प्रदेशमधील साधूंना मारहाण प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी गुन्हा गभीर दाखल करत सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. तसेच गैरसमजुकीतून हा सर्व प्रकार घडल्याचे समोर येत आहे.
चौघा साधुंना जत तालुक्यातल्या लवंगा इथे बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. साधूंना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चार साधू हे काही कामानिमित्ताने कर्नाटक या ठिकाणी आले होते. त्यानंतर ते जत तालुक्यातल्या लवंगा मार्गे पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते.
यादरम्यान लवंगा या ठिकाणी त्यांनी एका मुलाला पंढरपूरकडे जाण्याचा मार्ग विचारला. मात्र, त्या मुलाला साधूंची भाषा कळली नाही. त्या मुलाने इतर ग्रामस्थांना बोलावले. त्यातून ग्रामस्थांना चोर असल्याचा संशय आला. त्यातून हा मराहाणीचा प्रकार घडलेला आहे. घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले होते आणि त्यांनी साधना औषधोपचार देखील केले. मात्र, तक्रार देण्याच्या मानसिकतेमध्ये साधू नव्हते. त्यामुळे ते तिथून निघून गेले.
या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. या घटनेमुळे राजकारणातही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.