Home शासकीय महापालिकेच्यावतीने शहरात 21 टँकरद्वारे 62 फे-या बुधवारी कमी दाबाने व गुरुवारपासून पुर्ववत पाणीपुरवठा

महापालिकेच्यावतीने शहरात 21 टँकरद्वारे 62 फे-या बुधवारी कमी दाबाने व गुरुवारपासून पुर्ववत पाणीपुरवठा

8 second read
0
0
18

no images were found

महापालिकेच्यावतीने शहरात 21 टँकरद्वारे 62 फे-या

बुधवारी कमी दाबाने व गुरुवारपासून पुर्ववत पाणीपुरवठा

कोल्हापूर (प्रतिनिधी):- महापालिकेच्यावतीने शहरामध्ये आज 21 टँकरद्वारे 62 फे-याद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. काळम्मवाडी योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी सोमवारी व मंगळवारी पाणी पुरवठा बंद असल्याने महापालिकेच्या 4 व खाजगी 17 टँकरद्वारे शहरातील विविध भागामध्ये पाणी पुरवठा करण्यात आला. काळम्मावाडी योजनेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मंगळवारी रात्रौपर्यंत सुरु राहणार असून रात्रीच काळम्मावाडी येथून पाणी पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून बुधवारपासून पुर्ववत पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. त्याचबरोबर शहरामध्ये राजेंद्रनगर व कळंबा फिल्टर हाऊस जवळील खराब व्हॉल महापालिकेच्यावतीने आज बदलण्यात आले आहेत.

     शहरामध्ये आज महापालिकेच्या 4 टँकरक्षरे 27 फे-या व खाजगी 17 टँकरद्वारे 35 फे-या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने  ए,बी वॉर्ड अंतर्गत  मंगळवा पेठ परिसर, शिवाजी पेठ परिसर, सुभाषनगर, रायगड कॉलनी, योगेश्वरी कॉलनी, वारेवसाहत, उद्यमनगर, मंगेशकर नगर परिसर, वर्षानगर परिसर, कणेरकर नगर, सानेगुरुजी वसाहत, राजलक्ष्मीनगर, शिवगंगा कॉलनी, एन.टी.सरनाईक कॉलनी, शाहु बँक परिसर, पाटाकडील तालीम, सुब्राव गवळी तालीम परिसर, मंडलिक वसाहत, किर्ती हौसिंग सोसायटी व ई वॉर्ड अंतर्गत मातंग वसाहत, रघुनाथ चौक, राजारामपुरी, निंबाळकर चौक, कोरगावकर कंपाऊंड – सदर बाजार, शिवाजी पार्क, कदमवाडी, लोणार वसाहत, टाकळा, राजारामपुरी, भारत नगर, राजेंद्र नगर, गोळीबार मैदान, उलपे मळा, कसबा बावडा, वृषाली हॉटेल शेजारी, कनानगर – ताराबाई पार्क, कपूर वसाहत, कदमवाडी, लाईन बाजार, नागाळा पार्क, बापट कॅम्प इत्यादी ठिकाणी 21 टँकरद्वारे 62 फे-या करून शहर व उपनगरामध्ये पाणी पुरवठा करण्यात आला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी

माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या …