
no images were found
जिवबा नानाजाधव पार्क परीसरामध्ये 100 घरांचा सर्व्हे
डेंग्यु सदृश्य आजाराने युवकाचा मृत्यू
कोल्हापूर (प्रतिनिधी):- जिवबा नानाजाधव पार्क परिसरातील 100 घरांचा आज महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आला आहे. या परिसरातील कु.प्रथमेश घाटगे वय 22 याचा दि.07 जून 2025 ताप आलेने त्याने प्राथमिक उपचाराकरीता डॉ.विजय कुलकर्णी यांचेकडे तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी कु.प्रथमेश घाटगे याला रक्ताची तपासणी करणेसाठी सांगितले. रक्ताची तपासणी केलेनंतर त्यांचा डेंग्युचा आयजीएम व आयजीजीचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे सदर रुग्णाचा औषधोपचार डॉ.विजय कुलकर्णी यांचेकडे ओपीडी बेसवर चालु होता.
परंतु दि.09 जून 2025 रोजी रुग्ण कु.प्रथमेश घाटगे हे डॉ.विजय कुलकर्णी यांचेकडे सलाईन लावणेसाठी गेले असता, त्यांना तेथे खुप थंडी वाजुन आली. त्यांतर त्यांनी रुग्णाला तात्काळ डॉ.सागर पाटील यांचे विमल हॉस्पीटल या ठिकाणी आय.सी.यु.मध्ये दाखल केले. दरम्यान उपचारा सुरु असताना दि.10 जून 2025 रोजी पहाटे 2 चे दरम्यान कु.प्रथमेश घाटगे यांचा डेंग्यु सदृश्य आजाराने निधन झाले.
त्यामुळे महापालिकेने तातडीने आजुबाजुच्या परीसरातील 100 घरांचा सर्व्हे केला. यामध्ये या परिसरातील 312 लोकांची तपासणी केली असता या ठिकाणी 7 तापाचे रुग्ण आढळून आले. या सर्व्हेमध्ये 207 कंटेनरची तपासणी कण्यात आली. यामध्ये 5 कंटेनर दुषित आढळून आल्याने ते कंटेनर रिकामे करण्यात आले. त्याचबरोबर 40 नागरीकांचे रक्तजल नमुने तपासणीठी घेण्यात आले. या परिसरामध्ये महापालिकेच्यावतीने धुरफवारणी व औषध फवारणी करण्यात आली आहे.