Home क्राईम दोन मैत्रिणींच्या आत्महत्येनं पुणे हादरले

दोन मैत्रिणींच्या आत्महत्येनं पुणे हादरले

0 second read
0
0
77

no images were found

दोन मैत्रिणींच्या आत्महत्येनं पुणे हादरले

पुणे : पुण्यातील शेवाळेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ असलेल्या अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीमध्ये मंगळवारी सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास दोन मैत्रिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय १९) आणि सानिका हरिश्चंद्र भागवत (१९) असं आत्महत्या केलेल्या मैत्रिणीची नावं आहेत. दोघींनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सानिकाने सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीमधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हे आकांक्षाला समजताच ती त्या ठिकाणी पोहोचली, त्यानंतर सानिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना आकांक्षांनी पाहिला. हा धक्का आकांक्षाला सहन न झाल्याने तिने पाचव्या मजल्या वरून उडी मारून आपले जीवन संपवले आहे. वास्तविक पाहता या दोन आत्महत्यांचा आपसांमध्ये काही संबंध आहे का याचा तपास हडपसर पोलीस करत आहेत. एवढ्या कोवळ्या वयात दोन मैत्रिणींचा असा शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघींच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…