
no images were found
क्रॉम्प्टन त्यांच्या स्कल्प्टेड मार्वल – सायलेंटप्रो फ्लुइडो सिरीजसोबत जागतिक इंटिरियर्स दिन साजरा करणार
मुंबई: जागतिक इंटीरियर्स दिन निमित्त, भारतातील नंबर 1 फ़ॅन ब्रँड असलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने सायलेंटप्रो फ्लुइडो वेव्हचे अनावरण केले – ही त्यांची नवीनतम परिकल्पना आहे जी उच्च कार्यक्षमतेसह भविष्याभिमुख डिझाइन विचारसरणीचा मिलाप करते. या पदार्पणाद्वारे, क्रॉम्प्टनने सीलिंग फॅन्सच्या एका नवीन युगाची सुरुवात केली आहे जिथे आकार कार्यक्षमतेची सांगड घालतो आणि डिझाइन व कामगिरीचा मिलाप होतो. क्रॉम्प्टन एका कार्यात्मक उत्पादनाचे उत्कृष्ट कारागिरीद्वारे बनवलेल्या डिझाइनच्या उत्कृष्ट नमुन्यात रूपांतर करून घराच्या डिझाइनसाठी आवश्यक वस्तूंना पुन्हा परिभाषित करत आहे.आजचे ग्राहक त्यांच्या वैयक्तिक शैलीस प्रतिबिंबित करणारी घरे डिझाइन करण्यात भरपूर गुंतवणूक करतात आणि बहुतेकदा मिनिमलिस्टिक आणि समकालीन सौंदर्यदृष्टीस पसंती देतात. ते समरस आणि दिसण्यास आनंददायी परिसर राखण्यासाठी सजावटीच्या प्रत्येक घटकाला क्युरेट करतात. तथापि, बहुतेक सीलिंग फॅन्स केवळ गरज म्हणूनची जोड बनतात व काम करत राहतात आणि त्या मुळे आधुनिक इंटीरियरला पूरक ठरत नाहीत. ग्राहक अधिकाधिक अशा फॅन्सच्या शोधात असतात जे त्यांच्या सजावटीमध्ये अखंडपणे मिसळून मजबूत कामगिरी देतील – जागेत अडथळा बनण्याऐवजी त्यांना अधिक सुंदर बनवतील. अपेक्षांतील या बदलामुळे विचारपूर्वक डिझाइन केलेल्या फॅन्सची मागणी निर्माण झाली आहे जे बदलत्या आवडींशी अनुरूप असतील आणि घराच्या प्रत्येक पैलूमध्ये सौंदर्यशास्त्राचे वाढते महत्त्व परावर्तित करतील.
नाविन्यता आता पर्यायी राहिलेला नाही – तो आवश्यक आहे; याची क्रॉम्टनला जाणिव आहे. घरे व्यक्तिमत्त्वाच्या विशिष्ट आवडीनिवडीच्या अभिव्यक्तींमध्ये विकसित होत असताना, क्रॉम्प्टन सायलेंटप्रो फ्लुइडो वेव्हद्वारे या श्रेणीतील परिवर्तनाचे अग्रस्थान प्राप्त करतात. निसर्गाच्या तरलतेने प्रेरित होऊन, सायलेंटप्रो फ्लुइडो वेव्हचा प्रत्येक तपशील परिपूर्णतेने कोरलेला आहे, जो ‘स्कल्प्टेड-नॉट मेड/शिल्पित, बनवलेला नाही’ या मोहिमेच्या सिध्दांतास मूर्त रूप देतो. तरल गतीमानता आणि शिल्पकलेच्या आकारांतून तयार केलेला हा फॅन एअरोडायनॅमिक कामगिरीचा नव-भविष्यामुख सौंदर्याशी मिलाप घडवतो. हवा आणि भावना या दोन्हींना गतिशील करण्यासाठी डिझाइन केलेले हे उत्पादन भविष्यात विलय होणारी एक नवीन डिझाइन भाषा सादर करते – सीलिंग फॅन कसा असू शकतो याच्या अपेक्षांना नवीन आकार देते. अशा जगात जिथे तरल आकार वास्तुकला, फॅशन आणि सजावट यांची परिभाषा ठरवतात, ही रचना अपेक्षित कामगिरीच्या पलीकडे जाते – ती भावनांना उत्तेजित करते. क्रॉम्प्टनला सामान्याची नक्कल नको हवी होती; त्यांना एक कलापूर्ण अभिव्यक्ती निर्माण करायची होती जी कालातीत, अखंड आणि व्यक्त करू शकेल, बाहेरून दिसणारे नट किंवा बोल्ट नसल्यामुळे, प्रत्येक रुपरेषा विचारपूर्वक आहे, प्रत्येक वळण सहेतूक आहे. फ्लुइडो हे केवळ फॅनची नव्याने कल्पना करण्याबद्दल नाही – ते डिझाइन अवकाशाचे स्वामित्व प्राप्त करण्याशी आणि पंखे आजच्या घरांच्या विशिष्ट गरजांनुसार , समकालीन घरांना कसे पूरक आहेत हे पुन्हा परिभाषित करण्याबद्दल आहे.
कंपनीच्या नव्याने सादर केलेल्या उत्पादनाबद्दल बोलताना, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या होम इलेक्ट्रिकल्स आणि पंप्सचे व्यवसाय प्रमुख श्री. रजत चोप्रा म्हणाले, “ या डिझाइनमध्ये भावना, सौंदर्य आणि अर्थ जोडण्याची क्षमता आहे, ज्यामुळे आपला दररोजच्या उत्पादनांचा अनुभव बदलतो. जिथे एकेकाळी पंखे पूर्णपणे कार्यशील मानले जात होते, आज ते वैयक्तिक शैलीचे विस्तारित अंग आणि घराच्या सजावटीचा एक महत्त्वाचा घटक बनले आहेत. क्रॉम्प्टनमध्ये, आम्ही हा बदल ओळखला आहे आणि निसर्गाच्या सहज प्रवाहाने प्रेरित नवीन डिझाइन भाषेद्वारे पंख्याच्या श्रेणीची पुनर्कल्पना करत आहोत. गतिमानता आणि आधुनिकता दोन्ही परावर्तित करणाऱ्या अखंड, तरल स्वरूपांसह, आम्ही सौंदर्यशास्त्र आणि कामगिरीचा मिलाप करत आहोत ज्याद्वारे असे पंखे तयार केले जातील जे केवळ जागा थंड करत नाहीत तर जागेचे स्थान उन्नत करतील. नाविन्यपूर्णतेसह अग्रस्थानावर नेतृत्व करण्याच्या आमच्या प्रवासात हे एक धाडसी पाऊल आहे, जिथे आकार आणि कार्य परिपूर्ण समन्वयासह एकत्र येतात.”क्रॉम्प्टन सायलेंट प्रो फ्लुइडो वेव्ह फॅनने ‘घरगुती उपकरणे आणि घरगुती ॲक्सेसरीज’ श्रेणीमध्ये रेड डॉट अवॉर्ड 2025 जिंकला आहे – जे डिझाइन उत्कृष्टतेचे आंतरराष्ट्रीय मानचिन्ह आहे. ही स्वीकृती व ओळख सुंदर आणि कार्यक्षम उत्पादने तयार करण्याची आमची कटिबध्दता अधोरेखित करते.