no images were found
पुष्पा इम्पॉसिबल: प्रेरणादायी कथाकथनाची आणि देशभरातल्या कुटुंबांना आपल्याला वाटणाऱ्या पात्रांची 3 वर्षे!
सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल ही केवळ एक टेलिव्हिजन मालिका राहलेली नाही. हा एक असा प्रवास आहे, जो देशातल्या लक्षावधी लोकांनी पुष्पा आणि तिच्या घरच्यांच्या सोबतीने केला आहे. हृदयस्पर्शी कथानक आणि चार-चौघांसारखी पात्रे असलेल्या या मालिकेने सामान्य लोकांची स्वप्ने, त्यांचे संघर्ष आणि यश सुंदर पद्धतीने टिपले आहे. या मालिकेने तीन वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. अजूनही ही मालिका प्रेक्षकांना आपलीशी वाटते आणि त्यांना प्रेरित करते.
या लोकप्रिय कथानकाच्या केंद्रस्थानी पुष्पा (करुणा पांडे) ही व्यक्तिरेखा आहे. करुणा पांडेच्या प्रामाणिक अभिनयाने पुष्पाच्या भूमिकेत जीव ओतला आहे. पुष्पा एक सिंगल मदर आहे पण तिच्यात चिकाटी, हुशारी आणि हिंमत आहे. अंशुल त्रिवेदी (जुगल), जयेश मोरे (दिलीप), गरिमा परिहार (दीप्ती) दर्शन गुर्जर (चिराग), देशना दुगड (राशी) आणि नवीन पंडिता (अश्विन) या गुणी कलाकार संचामुळे मालिकेची मोहिनी आणखी वाढते. हे सगळे कलाकार मिळून माणसांचे एक असे जग उभे करतात, जिथले लोक प्रेमळ आहेत, ते एकमेकांना मदत करतात, त्यांच्यात मानवी दोषही आहेत, आणि त्यांच्यातील नाती हळूहळू प्रगल्भ होत जातात. त्यांच्या परफॉर्मन्समुळे प्रेक्षकांशी त्यांचे नाते जुळले आहे. अनेक कुटुंबांसाठी ‘पुष्पा इम्पॉसिबल’ हा त्यांच्या दिवासतला अविभाज्य भाग बनला आहे.
कथाकथनाचा निडर दृष्टिकोन ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेला इतर मालिकांपेक्षा उठावदार बनवते. महिला शिक्षणापासून ते दुसरी संधी आणि मानसिक आरोग्य यांसारख्या संबद्ध विषयांना ही मालिका स्पर्श करते, पण तरीही पात्रांची वैयक्तिक कथा वेधकपणे सांगते. हा मोठा टप्पा पार केल्याचा आनंद साजरा करत असताना ही मालिका प्रेक्षकांना या प्रेरणादायक कथानकाचे सोबती होण्यासाठी आमंत्रित करत आहे. ही अशी कथा आहे, जेथे हिंमत आहे, तर करुणा देखील आहे आणि सामान्य जीवनाचे येथे असामान्य कथेत रूपांतर होते!
टिप्पण्या
पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे:तीन वर्षांनंतर देखील मला सतत आश्चर्य वाटतं की आजही पुष्पा सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना किती आपलीशी वाटत आहे! कोणी तरुण विद्यार्थी असो, कामकाजी महिला असो किंवा निवृत्त शिक्षक असो असे कोणी तरी येऊन मला नेहमी सांगत असते की, ‘पुष्पा आमच्यातलीच एक वाटते”. हा ‘आपले’पणा हाच या मालिकेचा आत्मा आहे. आम्ही देखील प्रेक्षकांसोबत घडलो आहोत. मला वाटते, म्हणूनच हे नाते इतके घट्ट झाले आहे. पुष्पाचा प्रवास आजही खूप ताजा, संबद्ध आणि व्यक्तिगत वाटतो, फक्त मलाच नाही, तर इतकी वर्षे आमच्या सोबतीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला!”
हॅट्स ऑफ प्रॉडक्शनचे निर्माता जमनादास मजेठिया:पुष्पा इम्पॉसिबल पहिल्यापासून एका मालिकेपेक्षा विशेष वाटत आली आहे. या मालिकेत खरीखुरी माणसे आणि त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे. आम्ही जेव्हा पुष्पाची व्यक्तिरेखा रेखाटली, तेव्हा आम्हाला सत्याशी निगडीत पण आशेने भरलेली गोष्ट सांगायची होती. तीन वर्षांनंतर आमच्या प्रेक्षकांकडून जे प्रेम आम्हाला मिळत आहे, ते पाहून आम्ही भारावून गेलो आहे. भावना आणि सक्षमता या दोन्ही गोष्टी सारख्याच प्रमाणात उद्दीपित करणारी मालिका क्वचितच दिसते. याचे श्रेय मी आमच्या कलाकार संचाला, लेखकांना आणि सोनी सबच्या टीमला देईन, की त्यांनी या कथानकाचा आत्मा जिवंत ठेवला. पुष्पा हा प्रत्येक स्त्रीचा आवाज आहे आणि तिच्या सोबतीने हा प्रवास करताना आम्ही अभिमान अनुभवत आहोत.”