Home Uncategorized बकार्डीची पहिली मेड-इन-इंडिया व्हिस्‍कीची ‘जागतिक स्‍तरावर प्रशंसा 

बकार्डीची पहिली मेड-इन-इंडिया व्हिस्‍कीची ‘जागतिक स्‍तरावर प्रशंसा 

2 min read
0
0
38

no images were found

बकार्डीची पहिली मेड-इन-इंडिया व्हिस्‍कीची ‘जागतिक स्‍तरावर प्रशंसा 

मुंबई: भारतातील मद्यांसाठी उल्‍लेखनीय क्षण म्‍हणजे बकार्डीची पहिली मेड-इन-इंडिया प्रीमियम व्हिस्‍की ‘लेगसी’ला प्रतिष्ठीत वर्ल्‍ड व्हिस्‍कीज अवॉर्ड्स २०२५ येथे ब्‍लेण्‍डेड व्हिस्‍की कॅटेगरीमध्‍ये गोल्‍ड पुरस्‍कारसह सन्‍मानित करण्‍यात आले आहे. या सन्‍मानासह लेगसी जागतिक मान्‍यता मिळवणारी भारतातील नवीन प्रीमियम अभिव्‍यक्‍ती बनली आहे, जे देशांतर्गत व्हिस्‍की लँडस्‍केपसाठी महत्वपूर्ण यश आहे. आकर्षक, समकालीन आणि उत्‍कृष्‍टतेसह डिझाइन करण्‍यात आलेली लेगसी नवीन व्हिस्‍की असण्‍यासोबत जीवनशैली स्‍टेटमेंट आहे, ज्‍यामधून भारतातील आधुनिक विशिष्‍टता आणि जागतिक महत्त्वाकांक्षा दिसून येते.

साहसी दृष्टिकोन आणि तडजोड न करणाऱ्या दर्जासह भारतात निर्माण करण्‍यात आलेल्‍या लेगसीमध्‍ये भारतीय व स्‍कॉटिश माल्‍ट्ससह भारतीय ग्रेन्‍सचे वैशिष्‍ट्यपूर्ण मिश्रण आहे, जे संपन्‍न, सुधारित प्रोफाइल देते, ज्‍याने जगभरातील व्हिस्‍कीप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. हा पुरस्‍कार लेगसीला जागतिक स्‍तरावर घेऊन जातो, तसेच प्रीमियम व्हिस्‍की उत्‍पादित करण्‍याच्‍या विश्‍वामध्‍ये बकार्डीच्‍या वाढत्‍या प्रभावाला देखील निदर्शनास आणतो.

तीन वर्षांपूर्वी लाँच करण्‍यात आलेली लेगसी प्रीमियम व्हिस्‍की श्रेणीमध्‍ये अग्रणी ठरली आहे. या व्हिस्‍कीला भारतभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि अद्वितीय चव व परिपूर्णपणे संतुलित प्रोफाइलसह‍ ग्राहकांचे मन जिंकत आहे. मद्यापेक्षा अधिक लेगसी भारतीय कारागिरीचे सेलिब्रेशन आहे, ज्‍यामध्‍ये संपन्‍न, सर्वोत्तम अभिव्‍यक्‍ती समाविष्‍ट आहे, जी कालातीत वारसा आणि आधुनिक लक्षवेधकतेमधील तफावत दूर करते.

वर्ल्‍ड व्हिस्‍कीज अवॉर्ड्स मद्य विश्‍वामधील सर्वात प्रतिष्ठित व प्रखर जागतिक स्‍पर्धा आहे. दरवर्षाला आघाडीचे उद्योग तज्ञ, समीक्षक आणि टेस्‍टमकर्सचया पॅनेलकडून परीक्षण केले जाणारे अवॉर्ड्स श्रेणी व भौगोलिक क्षेत्रांमधील सर्वोत्तम व्हिस्‍कीजना सन्‍मानित करतात. या प्‍लॅटफॉर्मवर गोल्‍ड पुरस्‍कार मिळणे म्‍हणजे सर्वोत्तमतेचे प्रतीक आहे, जेथे प्रत्‍येक प्रवेशिकाचे प्रखर १०० मुद्दयांच्‍या माध्‍यमातून मूल्‍यांकन केले जाते आणि सुगंध, फ्लेवर, ब्लेंड आणि फिनिशवर लक्ष केंद्रित केले जाते. हे यश द ड्रिक्‍स बिझनेस एशियाने आयोजित केलेल्‍या एशिया स्पिरिट्स मास्‍टर्स २०२५ मध्‍ये मिळालेल्‍या सिल्‍व्‍हर पुरस्‍काराशी पूरक आहे, ज्‍यामधून आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर लेगसीची वाढती प्रतिष्‍ठा दिसून येते.

बकार्डी इंडियााचे भारतातील व शेजारील देशांमधील विपणन संचालक महेश कांचन म्‍हणाले, “आम्‍हाला लेगसीने वर्ल्‍ड व्हिस्‍कीज अवॉर्ड्स २०२५ मध्‍ये मिळवलेला गोल्‍ड पुरस्‍कार आणि एशिया स्पिरिट्स मास्‍टर्स २०२५ मध्‍ये मिळवलेला सिल्‍व्‍हर पुरस्‍कार यांचा अभिमान वाटतो. या महत्वपूर्ण क्षणामधून भारतातील व्हिस्‍कीला जागतिक स्‍तरावर स्थित करण्‍याचा आमचा दृष्टिकोन अधिक दृढ होतो. या मान्‍यतेमधून आकर्षक, विशिष्‍ट आणि भारतीय वारसामध्‍ये रूजलेले जागतिक दर्जाचे मद्य तयार करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्‍ही मर्यादांना दूर करत नाविन्‍यता आणण्‍याचा आणि व्‍याप्‍ती वाढवण्‍याचा प्रयत्‍न करत असताना लेगसी भारतातील व्हिस्‍कीसाठी नवीन कथानकाला आकार देण्‍यामध्‍ये नेतृत्‍व करते, जे अभिमान, उद्देश आणि जागतिक क्षमतेला सादर करते.”

लेगसी हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्‍थान, झारखंड, मेघालय, आसाम, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, महाराष्‍ट्र, तेलंगणा, केरळ, पॉंडीचेरी आणि गोवा या प्रमुख बाजारपेठांमध्‍ये ३ आकारांमध्‍ये (७५० मिली, ३७५ मिली आणि १८० मिली) उपलब्‍ध आहे, ज्‍यामधून जगभरातील अव्‍वल प्रायोरिटी म्‍हणून भारताप्रती बकार्डीची कटिबद्धता दिसून येते. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…