Home Uncategorized शब्बीर अहलूवालियाचा फिटनेसचा प्रेरणादायक प्रवास

शब्बीर अहलूवालियाचा फिटनेसचा प्रेरणादायक प्रवास

10 second read
0
0
7

no images were found

शब्बीर अहलूवालियाचा फिटनेसचा प्रेरणादायक प्रवास

 

बरेचसे अभिनेते आपल्या एसयूव्ही मधून सेटवर येत असतात. पण शब्बीर अहलूवालियाची वेगळीच तऱ्हा आहे. आठवड्यातून दोनदा घरून सोनी सबच्या ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ च्या सेटवर तो चक्क सायकलवरून येतो. त्यामुळे अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळतात आणि तो मात्र आपल्या फिटनेसचे लक्ष्य साधण्याच्या प्रयत्नात असतो. शब्बीरसाठी सायकलिंग हे केवळ प्रवासाचे माध्यम नाही, तर धकाधकीच्या शूटिंगच्या शेड्यूलसाठी शारीरिक आणि मानसिक तयारी करण्यासाठी त्याने अंगिकारलेला तो नित्यक्रम आहे. कुशाग्र, साधे आणि प्रत्येक गंभीर किंवा रोमॅंटिक दृश्यासाठी नेहमी तयार राहण्यामागचे त्याचे हे खुले गुपित आहे.

      त्याच्या सायकलचा आवाज सेटवर एका चांगल्या दिवसाची नांदी देतो. त्याचे सह-कलाकार सकाळी सेटवर येऊन कॉफी पीत वॉर्म-अप करत असतात, तेव्हा शब्बीरचा कार्डियो होऊन गेलेला असतो. तो सेटवर येतो, तोच उत्साहात, एकाग्र मनाने आणि एकदम तरतरीत. केवळ सेटवरच्या क्रू सदस्यांनाच हे जाणवलेले नाही, तर महिला चाहत्या देखील त्याला सायकल चालवताना पाहून वेड्या होतात. त्याची सहज मोहकता आणि कामाबद्दलची निष्ठा त्यांना आकर्षित करते. शिस्त आणि त्याच्यातील उपजत आकर्षण यामुळे ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ च्या सेटवरील त्याची उपस्थिती वेधक बनते- पडद्यावर आणि पडद्याच्या मागे देखील.

      ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत युग सिन्हा ही व्यक्तिरेखा साकारणारा शब्बीर अहलूवालिया म्हणतो, “घरून सायकलवरून सेटवर येणे हे केवळ इथे येण्याचे माध्यम नाही, तर मी जी व्यक्तिरेखा करत आहे, तिच्यात प्रवेश करण्यासाठीचा माझा हा नित्यक्रम आहे. सायकलिंग केल्यामुळे माझे मन स्वच्छ होते, ऊर्जा कार्यान्वित होते आणि मी दिवसभराच्या शूटिंगसाठी सज्ज होतो. सायकल चालवल्याने मी फिट राहतो, माझा स्टॅमिना वाढतो आणि मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये माझा वेळही वाचतो. असे, सगळीकडून त्याचे फायदेच आहेत. सायकल चालवत असताना मी शांत असतो, नियंत्रित असतो आणि मग दिवसभर प्रेम नाट्य आणि गोंधळाची दृश्ये करण्यासाठी तयारही असतो. कामासाठी तयारी करण्याचा हा माझा आवडता मार्ग बनला आहे. आणि मला वाटते, त्याचा परिणाम पडद्यावरही दिसतो.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पुष्पा इम्पॉसिबल: प्रेरणादायी कथाकथनाची आणि देशभरातल्या कुटुंबांना आपल्याला वाटणाऱ्या पात्रांची 3 वर्षे!

पुष्पा इम्पॉसिबल: प्रेरणादायी कथाकथनाची आणि देशभरातल्या कुटुंबांना आपल्याला वाटणाऱ्या पात्…