
no images were found
भारतातील सर्वात वेगवान ड्रेन क्लीनर ‘हार्पिक ड्रेनएक्सपर्ट’
नवी दिल्ली, : आघाडीची जागतिक ग्राहक आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रातील कंपनी रेकिटने आपल्या ड्रेन क्लीनर श्रेणीत एक क्रांतिकारी नवीन उत्पादने सादर केली आहे – हार्पिक ड्रेनएक्सपर्ट. हे अत्याधुनिक उत्पादन भारतातील सर्वात जलद कार्य करणारे ड्रेन क्लीनर* असून, स्वयंपाकघरातील अडकलेल्या नाल्या केवळ १५ मिनिटांत^ मोकळ्या करण्याची क्षमता ठेवते. हे उत्पादन वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीचे आणि प्रभावी ठरते.
भारतामधील सर्वात विश्वासार्ह स्वच्छता ब्रँड्सपैकी एक असलेला हार्पिक नेहमीच कोट्यवधी घरांमध्ये रोजच्या स्वच्छतेसंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी अत्याधुनिक उपाय प्रदान करत आला आहे. आता नव्या हार्पिक ड्रेनएक्सपर्टसह, ब्रँडने स्वयंपाकघरातील अडकलेल्या नाल्यांसाठी भारतातील सर्वात वेगवान* आणि प्रभावी ड्रेन क्लीनर बाजारात सादर केला आहे.स्वयंपाकघरातील अडकलेली नाली ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या असून, ती घरातील रोजच्या कामांमध्ये अडथळा निर्माण करते. पारंपरिक उपाय जसे की प्लंजर, वायर किंवा बेकिंग सोडा, गरम पाणी यांसारखे घरगुती उपाय हे वेळखाऊ, अस्वच्छ आणि अपुरी परिणामकारकता दर्शवणारे असतात. प्लंबरला बोलावणे म्हणजे आणखी वेळ लागतो आणि त्रास होतो, ज्यामुळे वैताग वाढतो. हीच अडचण लक्षात घेऊन, हार्पिक ड्रेनएक्सपर्टचे प्रगत फॉर्म्युलेशन ग्राहकांना एक प्रभावी, जलद आणि झंझटमुक्त ड्रेन क्लीनिंगचा अनुभव देते. केवळ १५ मिनिटांत^ नाली पूर्ववत करून देते आणि स्वयंपाकघरातील काम सुरळीत सुरू होण्यास मदत करते. कार्यक्षमता आणि सोयीसाठी यामुळे एक नवा मापदंड निर्माण झाला आहे.
रेकिट साउथ आशिया (हायजीन विभाग)चे मार्केटिंग डायरेक्टर गौतम ऋषी म्हणाले, “नवीन हार्पिक ड्रेनएक्सपर्टद्वारे आम्ही भारतीय घरांमध्ये स्वयंपाकघरातील अडकलेल्या नाल्यांसाठी एक अत्याधुनिक आणि प्रभावी उपाय सादर करत आहोत, जो अधिक परिणामकारक, वेगवान आणि वापरण्यास सोपा आहे. हे उत्पादन ग्राहकांना केवळ १५ मिनिटांत^ कठीणातील कठीण अडथळे दूर करण्याचे जलद आणि सोयीचे समाधान देते. हार्पिक ड्रेनएक्सपर्ट हे आमच्या त्या बांधिलकीचे प्रतीक आहे की, आम्ही भारतभरातील ग्राहकांसाठी दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यासाठी आणि स्वच्छतेचे दर्जा उंचावण्यासाठी नेहमीच उत्कृष्ट उत्पादने आणत राहू.”
स्वतंत्र संशोधनाच्या आधारावर सिद्ध झालेले हे उत्पादन भारतातील स्वयंपाकघरातील अडकलेल्या नाल्यांसाठी सर्वात वेगवान ड्रेन क्लीनर आहे, जे सोयीसुविधा आणि कार्यक्षमतेचा नवा मानक सेट करते. स्वयंपाकघरातील नाल्या सफाई करण्याच्या अपूर्व वेग आणि कार्यक्षमतेमुळे, हार्पिक ड्रेनएक्सपर्ट ड्रेन क्लीनिंग सोल्यूशन्ससाठी एक नवा मापदंड ठरतो, ज्यामुळे ग्राहकांना स्वच्छता आणि आरोग्य सहजतेने राखण्यासाठी एक शक्तिशाली साधन मिळते.