Home क्राईम मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात रिक्षाचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग

मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात रिक्षाचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग

0 second read
0
0
218

no images were found

मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात रिक्षाचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग

ठाणे : ठाण्यात रिक्षाचालकाकडून मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. ठाण्याच्या स्टेशन रोड परिसरात एक रिक्षावाला एका शाळकरी मुलीला फरफटत नेत असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या घटनेत शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. त्या मुलीला फरफटत नेण्यामागे त्या रिक्षावाल्याचा नेमका काय हेतू होता? याचा पोलीस तपास करत आहेत.
यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली केल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि अवघ्या २४ तासांच्या आतमध्ये आरोपी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली. परंतु या धक्कादायक घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच महिला असुरक्षित असल्याचं चित्र यामुळे समोर येत आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…