Home राष्ट्रीय अपना देसी चायनीजनला भारतातील सर्वात मोठा इंडो-चायनीज ब्रँड म्हणून किताब मिळाला 

अपना देसी चायनीजनला भारतातील सर्वात मोठा इंडो-चायनीज ब्रँड म्हणून किताब मिळाला 

8 second read
0
0
14

no images were found

अपना देसी चायनीजनला भारतातील सर्वात मोठा इंडो-चायनीज ब्रँड म्हणून किताब मिळाला 

     पारंपरिक चायनीज चव आणि भारतीय मसाल्यांच्या अनोख्या चवीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय चायनीज रेस्टॉरंटची एक साखळी ‘चालू अपना देसी चायनीज’ला ही घोषणा करताना आनंद होत आहे की गोव्यातील प्रतिष्ठित सरदार पटेल युनिटी पुरस्कार २०२५ सोहळ्यात ‘भारताचा सर्वात मोठा इंडो-चायनीज ब्रँड २०२४’ या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले आहे. हा पुरस्कार ११ एप्रिल २०२५ रोजी गोव्यातील हॉटेल मॅरियट रिसॉर्ट येथे आज तक इंटरनॅशनल आणि इंडिया न्यूज यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता, लाईफस्टाईल मॅगझिन हे मॅगझिन पार्टनर होते आणि आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये त्याचे कव्हरेज देखील दाखवण्यात आले होते.

 

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री शिव प्रताप शुक्ला यांसारखे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सरदार पटेल युनिटी पुरस्कार सोहळा टॉपनॉच फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात व्यवसाय, आरोग्य, शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना सन्मानित केले जाते. २०२५ च्या आवृत्तीत उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रशंसा करण्यासाठी व्यावसायिक पुढारी आणि इतर मान्यवरांना एकत्र करून आपली परंपरा कायम ठेवण्यात पाठीमागे राहिले नाहीत.गोव्याचे माननीय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत, भारतीय मंत्रालयाचे माननीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद नायक आणि माननीय खासदार श्रीमती हेमा मालिनी यांच्या उपस्थितीत “भारताचा सर्वात मोठा इंडो-चायनीज ब्रँड २०२४” हा प्रतिष्ठित किताब चालू अपना देसी चायनीजला अभिमानाने प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळणे म्हणजे ब्रँडच्या यशस्वी प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.

 

या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, चालू अपना देसी चायनीजचे संस्थापक विभांशु मिश्रा म्हणाले की हा पुरस्कार मिळणे म्हणजे माझ्यासाठी आणि संपूर्ण चालू अपना देसी चायनीज कुटुंबासाठी खूपच खास क्षण आहे. आम्ही भारताच्या कानाकोपऱ्यात चटकदार, चविष्ट इंडो-चायनीज खाद्यपदार्थ पोहोचवण्याचे एक छोटेसे स्वप्न म्हणून सुरुवात केली होती, परंतु त्यापलीकडे जाण्याचा आम्ही विचार केला आणि कॅनडातील ओंटारियोमध्ये पहिले आउटलेट सुरू केले. एवढेच काय तर जागतिक स्तरावर विस्तार देखील करत आहोत. आमच्या कामाची मिळालेली ही पावती आम्हाला आणखी आवडीने काम करण्यास आणि कामाच्याप्रती निष्ठा ठेवण्यास प्रवृत्त करते. मी आमच्या निष्ठावंत ग्राहकांचे, मेहनतीने काम करणाऱ्या टीमचे आणि या प्रवासात कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभागी झालेल्या सर्वांचे खूप आभार व्यक्त करत आहे.

 

२०२० मध्ये स्थापन केलेले चालू अपना देसी चायनीजने भारतभर झपाट्याने विस्तार केला आहे, २०० हून अधिक आउटलेट्सच्या सहाय्याने ३३ हून अधिक शहरांमधील ग्राहकांना संतुष्टीत केले आहे. भारतीय पाककृतीतील समृद्ध मसाले आणि चायनीज पदार्थांची उमामी चव यांना एकत्रित आणणारा ब्रँड म्हणून घराघरात पोहोचला आहे, ज्यामध्ये हक्का नूडल्स सारख्या देसी ट्विस्ट ते सुगंधित मंचुरियन कारींनी समृद्ध अशा विशिष्ट डिशेस आहेत. जिथे प्रत्येक डिश भारतीय आणि जागतिक चवीनुसार मन तृप्त करण्यासाठी तयार केल्या जातात.’भारताचा सर्वात मोठा इंडो-चायनीज ब्रँड २०२४’ हा पुरस्कार चालू अपना देसी चायनीजच्या प्रभावी वाढीचा, गुणवत्तेवर भर देण्याचा आणि खाद्यपदार्थ क्षेत्रातील अग्रणी वृत्तीचा पुरावा आहे. एमएसजी, पाम तेल आणि कृत्रिम वर्धक यांचा वापर न करता ताजे, नैसर्गिक घटक वापरण्यावर कंपनीने भर दिला असून ते पाककृती क्षेत्रात एक ट्रेंडसेटर बनले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राष्ट्रीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि मग कार्यकर्ता या विचारधारेवर भाजपची वाटचाल, कराडमध्ये झाली भाजपा संघटन पर्व अंतर्गत बैठक

राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि मग कार्यकर्ता या विचारधारेवर भाजपची वाटचाल, कराडमध्ये झाल…