
no images were found
“अशी ही जमवा जमवी” चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली धडाकेबाज कमाई !!
मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित कौटुंबिक विनोदी चित्रपट “अशी ही जमवा जमवी” ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत, आपल्या प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चांगली कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यापासून केवळ सात दिवसांतच या चित्रपटाने कोटींची भरघोस कमाई केली आहे.
शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात हा सिनेमा पहायला गर्दी करत आहेत.
चित्रपटाची कथा, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शकाची प्रभावी मांडणी यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवा उत्साह निर्माण करत, “अशी ही जमवा जमवी” या बहुप्रतीक्षित चित्रपटाने दणदणीत यश मिळवलं आहे. तरुण वर्गासोबतच सर्व वयोगटांमध्ये हा सिनेमा गाजतोय.
दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते सोबत ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर अशा लोकप्रिय कलाकारांची फौज या सिनेमात आहे. हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली प्रदर्शित झाला असून, व्ही. शांताराम यांचे नातू राहुल शांताराम यांचे हे पहिले निर्मिती आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अशी ही जमवा जमवी” हा सिनेमा १० एप्रिल पासून चित्रपटगृहात धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.