no images were found
मनसेचा भाजपला पाठिंबा? राज ठाकरे तातडीने ‘वर्षा’वर दाखल
मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटील गेले असून अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार असून भाजपसोबत युती करणार नसल्याचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे कुणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष लागलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर राज ठाकरे त्यांची भेट घेणार असून ते रवाना झाले आहेत.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि ठाकरे गटाने मोर्चेबांधणी केली असून एकमेकांविरूद्ध दंड थापटले आहेत. अंधेरीसाठी भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप युतीकडून शिंगे गटाचा उमेदवार न देता मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुरजी पटेल यांना ६ वर्ष निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले असतानादेखील उमेदवारी अर्ज कसा काय स्विकारला असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.