
no images were found
देश २०२९ मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच कौल देणार-हेमंत पाटील
पुणे,:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याची उपराजधानी नागपूर येथे नुकतीच भेट देत माधव नेत्रालय इमारतीचे भूमिपूजन केले. नागपूर भेटी दरम्यान त्यांनी रेशीमबागेतील स्मृतीमंदिर तसेच दीक्षाभूमीला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. मात्र, विरोधी पक्ष मोदींच्या या दौऱ्यावरच संभ्रम निर्माण करीत त्यांच्या खंबीर नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची बाब गंभीर आणि तेवढीच चिंताजनक आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.२) व्यक्त केले.
देश २०२९ मध्ये होणारा सार्वत्रिक निवडणुकीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करीत त्यांना पंतप्रधान पदी आरूढ करतील, असा दावा देखील यानिमित्ताने पाटील यांनी केला.सर्वाधिक काळापर्यंत पंतप्रधानपदी राहण्याचा इतिहास पंतप्रधान मोदी यांच्या नावावर लिहण्याचा मान जनताच देईल, असे भाकित देखील पाटील यांनी वर्तवले. पंरतू, मोदी यांची वाढती लोकप्रियता बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याने त्यांच्या वयाचे कारण पूढे करीत ते त्यांच्या नेतृत्वाबद्दल जनमानसात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील २०२९ मध्ये मोदीच सर्वोच्च पदावर राहतील, हे स्पष्ट केले आहे.
पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर असलेले मोदींचा वारस शोधण्याचे कार्य संघाकडून केले जात असल्याचा अपप्रचार विरोधक करीत आहे. संघाने या अपप्रचाराला फारसे महत्व दिलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात देशाला एक सुर्वण भविष्य दिसत आहे. सर्वसामान्यांसाठी अनेक योजना तसेच निर्णय घेत मोदींनी वंचितांना समोर नेण्याचे काम केले आहे. अंत्योदय पर्यंत विकासगंगा पोहचवण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. मोदींच्या नेतृत्वाबद्दल त्यामुळेच एक स्वाभाविक प्रेम लोकमनात निर्माण झाले आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला त्यामुळे जनता बळी पडणार नाही, असे पाटील म्हणाले.