
no images were found
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातवस्रसंहिता लागू करा ! – मंदिर महासंघाचे निवेदन
कोल्हापूर(प्रतिनिधी ):- मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला असून मंदिरे ही ईश्वरी चैतन्याचा स्त्रोत असून भाविक आणि भक्तांना मनःशांती प्रदान करणारी आणि अव्याहतपणे अध्यात्मिक ऊर्जा पुरवणारी केंद्रे आहेत. हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांच्या रक्षणासाठी आणि हिंदूंच्या जीवनाचा अविभाज्य घटक असणार्या मंदिरांचे पावित्र्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वी मंदिरांमध्ये सात्विक वेशभूषा करून हिंदू जात असत; मात्र अलीकडे पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणामुळे अनेक हिंदू मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांत आणि असात्विक वेशभूषेत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी. वस्त्रसंहितेचा मुख्य उद्देश हा भारतीय संस्कृतीला परंपरेला साजेशी वस्रे परिधान करावीत हा आहे. आधुनिकतेकडे वळतांना वस्त्रसंहितेच्या संदर्भात पालन व्हावे. अलिकडच्या काळात मुंबई येथील श्री सिद्धीविनायक मंदिर आणि जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिरात वस्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले श्री महालक्ष्मी देवस्थानातील श्री महालक्ष्मीदेवी-आई अंबाबाईदेवीच्या पावित्र्य टिकवणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे, असे आम्ही समजतो. यामुळे या मंदिरात येताना सात्विक वेशभूषा करून हिंदूंनी यावे, यासाठी आपल्या मंदिर व्यवस्थापनाने श्री महालक्ष्मीदेवी-आई अंबाबाईदेवी मंदिरात वस्रसंहिता लागू करावी, मागणीसाठी ३० मार्च या दिवशी श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक श्री. अनिल दिंडे यांना मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे श्री. दिंडे यांनी सांगितले.
या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संयोजक श्री. प्रमोद सावंत, सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. शरद माळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे उपस्थित होते.