
no images were found
टाटा न्यू एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने गाठला मोठा टप्पा:
मुंबई,: टाटा न्यू आणि एचडीएफसी बँकेने आज एक लक्षणीय टप्पा गाठल्याचे घोषित केले. टाटा न्यू एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने 2 मिलियन कार्ड्स जारी करण्याचा मैलाचा दगड मागे टाकत भारतातील पसंतीचे रिवॉर्ड क्रेडिट कार्ड म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. या सिद्धीमधून देशभरातील ग्राहकांना मूल्य आणि निर्बाध रिवॉर्डची ईकोसिस्टम प्रदान करण्यातील या कार्डचे उल्लेखनीय यश अधोरेखित झाले आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये लॉन्च झाल्यापासून टाटा न्यू एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. भारतीय क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये सर्वात सुलभ आणि पारदर्शक रिवॉर्ड ईकोसिस्टम ऑफर करत असल्याबद्दल यूझर्सने त्यांना पसंत केले आहे. नवीन कार्ड जारी करण्यात त्यांचा वाटा (FY25 च्या तिसऱ्या तिमाहीत 13%पेक्षा जास्त निव्वळ नवी कार्ड्स जारी केली- RBI) लक्षणीय असून देशभरातील ग्राहकांचा विश्वास आणि निष्ठा त्यांनी झपाट्याने जिंकली आहे.
टाटा डिजिटलचे चीफ बिझनेस ऑफिसर, फायनॅनष्यल सर्व्हिसेस श्री. गौरव हजराती म्हणाले, “टाटा डिजिटलमध्ये, आमच्या ग्राहकांसाठी लाभ अधिक रिवॉर्ड देणारे आणि पारदर्शक बनवून क्रेडिट कार्डच्या अनुभवात क्रांती आणण्याबाबत आम्ही वचनबद्ध आहोत. 2 मिलियन टाटा न्यू एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड्स जारी करण्याचा टप्पा ओलांडणे हा आमच्या ग्राहकांनी न्यूकार्डमध्ये दाखवलेल्या विश्वासाचा दमदार पुरावा आहे. न्यूकार्डचा अनुभव सतत सुधारण्याबाबत आणि न्यूकार्ड धारकांच्या वाढत चाललेल्या समुदायाला अधिक चांगले मूल्य प्रदान करण्याबाबत आम्ही वचनबद्ध आहोत.”
टाटा न्यू एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डसोबत केलेला प्रत्येक व्यवहार ग्राहकांसाठी रिवॉर्ड्सचे एक जणू विश्वच खुले करतो. यामध्ये 10% बचत, न्यूकॉईन उत्पन्नात तेजी आणि प्रवास, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, वाणसामान व इतर क्षेत्रांमध्ये खास विशेषाधिकार वगैरेचा समावेश आहे. या कार्डचा सहज, टेक्नॉलॉजी-प्रेरित अनुभव आधुनिक डिजिटल जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करतो, ज्यामध्ये डिजिटल ऑनबोर्डिंग, तत्काळ मंजुरी आणि संपर्करहित पेमेंटचा समावेश आहे.
एचडीएफसी बँकेचे कंट्री हेड- पेमेंट्स, लायबिलिटी प्रॉडक्ट्स, कन्झ्युमर फायनॅन्स आणि मार्केटिंग श्री. पराग राव म्हणतात, “भारतातील आघाडीचा कार्ड जारीकर्ता म्हणून प्रत्येक ग्राहक वर्गासाठी, त्याला उत्कृष्ट पेमेंट सोल्यूशन देणारे एक कस्टमाइझ्ड ऑफरिंग बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्हाला आनंद आहे की, आपला डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोन आणि दमदार मूल्य प्रस्तावासह टाटा न्यू एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड यूझरचा अनुभव वाढवण्यात आणि दैनंदिन खर्चांचे रिवॉर्डिंग क्षणांत रूपांतर करण्यात यशस्वी झाले आहे.”
कार्डधारक टाटा न्यू वर नॉन-EMI खर्चावर 10% न्यूकॉईनच्या रूपात परत मिळवू शकतात आणि पार्टनर टाटा ब्रॅंड्स (इन-स्टोअर सह)वर न्यूकॉईनच्या रूपात 5% परत मिळवू शकतात तसेच पात्र नॉन-टाटा आणि मर्चंट EMI खर्चांवर 1.5% न्यूकॉईनच्या रूपात परत मिळवू शकतात आणि UPI व्यवहारांवर अतिरिक्त रिवॉर्ड मिळवू शकतात. देशांतर्गत विमानतळांवरील लाऊंजमध्ये निःशुल्क प्रवेश आणि कार्ड धारकांसाठी प्रतिष्ठित IHCL सिल्व्हर मेंबरशिप या कार्डचे आकर्षण आणखी वाढवतात.
टाटा न्यू एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड रूपे आणि व्हिसा अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे, जे देशभरातील ग्राहकांसाठी प्रीमियम डिजिटल पेमेंट सुलभ बनवते आणि शिवाय रिवॉर्डही देते.