
no images were found
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे शनिवारी ‘अर्थ अवर’चे आयोजन:३० हजारहून अधिक स्ट्रीट लाईट्स १ तास रहाणार बंद
कसबा बावडा (प्रतिनिधी): डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागच्यावतीने शनिवारी (दि. २२) ‘अर्थ अवर’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या दिवशी रात्री १ तास विजेची उपकरणे बंद ठेवून वीज बचत व पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संतोष चेडे व डीन स्टुडंट्स अफेअर डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
उपक्रमाचे समन्वयक प्रा. योगेश चौगुले म्हणाले, कोल्हापूर शहरातील आय. आर. बी. अंतर्गत रस्त्यावरील बल्ब, हायमास्ट दिवे व एल.ई.डी. असे ३०,००० हून अधिक पथदिवे शनिवारी सायंकाळी ७:३० ते ८:३० या वेळेत बंद राहणार आहेत. तसेच डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे बिंदू चौक येथे रात्री ७:३० वा. पणत्यांपासून ‘अर्थ अवर’चा ६० हा लोगो तयार करण्यात येणार आहे. शहरात पथदिवे, घरगुती बल्ब बंद ठेवून नागरिकांनाही ‘अर्थ अवर २०२५’मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी एन. एस. एस. विद्यार्थी विशेष परिश्रम घेत आहेत.