
no images were found
महापालिकेत मुर्तीकार संघटनेशी इकोफ्रेंडली गणेश मुर्ती करणेबाबत संयुक्त बैठक संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी): सार्वजनिक गणेश उत्सवापुर्वी मुर्तीकार संघटनेशी इकोफ्रेंडली गणेश मुर्ती करणेबाबत महापालिकेत संयुक्त बैठक आज आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस शहरातील मुर्तीकार संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सन 2020 च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणेकरीता सर्व मुर्तीकारांनी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी मुर्तीकारांना करण्यात आले. तसेच सर्व मुर्तीकारांनी महानगरपालिकेमध्ये आपल्या व्यवसायाची नोंदनी करणे बंधनकारकर असल्याचे सांगितले. यासाठी आवश्यक ते फॉर्म उपलब्ध करुन दिले जातील. शासन निर्णयानुसार महापालिका स्तरावर नदी, तलाव यांचे जल प्रदूषण नियंत्रण करण्याकरिता जास्तीत जास्त विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात येणार असलेचे सांगितले.
यावेळी उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय अधिकारी अंकूश पाटील, रोहिदास म्हतकर, कुंभार समाजाचे अध्यक्ष अनिल निगवेकर, संचालक प्रमोद कुंभार, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, उपशहर अभियंता महादेव फुलारी, रमेश कांबळे, सुरेश पाटील, अरुण गुजर, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, परवाना अधिक्षक अशोक यादव, कनिष्ठ अभियंता अवधूत नेर्लेकर व कुंभार समाजाचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.