
no images were found
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने वेळेपूर्वीच पूर्ण केला ११वा वेतन करार
किर्लोस्कर समूहाच्या प्रमुख कंपनीपैकी एक असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड यांनी आपला ११वा वेतन करार यशस्वीरीत्या पूर्ण केला असून तो दिलेल्या वेळेपूर्वीच संपन्न झाला आहे. हि महत्वाची घटना किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या कामगार कल्याण, औद्योगिक सौहार्द आणि शाश्वत विकासाच्या प्रति बांधील असण्याचे प्रतीक आहे. हा करार उत्पादकता वाढ, कर्मचाऱ्यांचे हित आणि कंपनीचे दीर्घकालीन यश यांना चालना देणाऱ्या कार्यसंस्कृतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
वेतन करार वेळे अगोदर आणि प्रगतिशील पणे पूर्ण करण्याच्या कंपनीच्या सातत्यपूर्ण इतिहासाचे द्योतक म्हणून २०११ मध्ये किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे झालेले वेतन करार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेले आहेत. या यशामध्ये व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर सहकार्य महत्त्वाची भूमिका बजावते.
वेतन करार सोहळ्यास कंपनीचे अध्यक्ष श्री. अतुल किर्लोस्कर, व्यवस्थापकीय संचालक सौ. गौरी किर्लोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल सहाय, मुख्य मानव संसाधन अधिकारी श्री. जॉर्ज वर्गिस, मुख्य वित्तीय अधिकारी श्री. सचिन केजरीवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी (संचालन) श्री. मकरंद जोशी, बी टू बी विभागाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी श्री. अमरजीत सिंग, उत्पादन विभागातील मानव संसाधन विभाग प्रमुख श्री. वीरेंद्र गायकवाड आणि फॅक्टरी मॅनेजर श्री. मिलिंद बोटे यांच्यासह कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील प्रमुख सदस्य उपस्थित होते.
कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री. संजीव गायकवाड, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र येडे, सचिव श्री. उल्हास खुटवड आणि कोषाध्यक्ष श्री. विकास कोरे यांनी प्रतिनिधित्व केले. हा करार कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील परस्पर विश्वास, सहकार्य आणि सामायिक मूल्यांचे प्रतीक आहे.
या यशस्वी वेतन करारामुळे किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या प्रगत आणि कर्मचारी-केंद्रित कार्यसंस्कृती निर्माण करण्याच्या वचनबद्धतेला आणखी बळकटी मिळाली आहे. कंपनीचा विकास, नवकल्पना आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देत औद्योगिक सौहार्द टिकवून ठेवण्याच्या दिशेने कंपनी सातत्याने पुढे जात आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स ही केवळ औद्योगिक क्षेत्रातील सौदार्ह्यास चालना देणारी कंपनी नसून विविध उद्योगांमध्ये शाश्वत, कार्यक्षम आणि नाविन्यपूर्ण उत्पादने प्रदान करणे हेच कंपनीचे व्यापक ध्येय आहे.
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड:
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड ही इंजिन, जनसेट्स आणि कृषी उपकरणे तयार करणारी आघाडीची उत्पादक कंपनी आहे. कंपनी वीज निर्मिती, उद्योग, शेती आणि सागरी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. किर्लोस्कर ग्रुपच्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सची ओळख नाविन्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनासाठी आहे. जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत कंपनी ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील भविष्य घडवण्यासाठी शाश्वत आणि कार्यक्षम उपाय प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे.