Home मनोरंजन शो सुरू राहिला पाहिजे,” : अक्षय देव बिंद्रा 

शो सुरू राहिला पाहिजे,” : अक्षय देव बिंद्रा 

2 second read
0
0
13

no images were found

शो सुरू राहिला पाहिजे,” : अक्षय देव बिंद्रा 

झी टीव्हीवरील आवडती मालिका – ‘कुमकुम भाग्य’ – हल्लीच घेतलेल्या झेपेनंतर आपल्या आकर्षक कथानक आणि अनपेक्षित वळणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. आगामी भागांमध्ये भावनिकदृष्ट्या भरलेल्या दृश्यांसाठी हा शो सज्ज होत असताना रौनकची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय देव बिंद्रा याने आपल्या कलेप्रती अढळ वचनबद्धता दाखवत त्याला हेअरलाइन फ्रॅक्चर असतानाही चित्रीकरण सुरू ठेवले.

अलिकडेच एका क्लबमध्ये एका जबरदस्त मारामारीच्या दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान, जिथे रौनक प्रार्थना (प्रणाली राठोड) चे रक्षण करण्यासाठी येतो, तेव्हा अक्षयच्या उजव्या करंगळीला दुखापत झाली. सर्व सुरक्षा खबरदारी घेऊनही या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या करंगळीला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले. टीमने त्याला ब्रेक घेण्याची ऑफर देऊनही त्याने आपली चिकाटी आणि या मालिकेवरील प्रेमामुळे वेदना सहन करूनही चित्रीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. चित्रीकरणादरम्यान त्याचा दृढनिश्चय आणि प्रोफेशनलिझम पाहून संपूर्ण टीम थक्क झाली. आपल्या उल्लेखनीय समर्पणासह तो आपले पात्र अक्षरशः जिवंत करत आहे!

आपला अनुभव सांगताना अक्षय म्हणाला, “हे दृश्य नाट्यमय होते कारण मला शारीरिक हाणामारी करायची होती. टीमने सर्व सुरक्षा उपायांची खात्री केली होती, पण दुर्दैवाने माझ्या उजव्या करंगळीला दुखापत झाली. हे हेअरलाइन फ्रॅक्चर आहे, सुरुवातीला मला फारसे दुखत नव्हते. तेव्हा ते फ्रॅक्चर आहे हे मला माहित नव्हते, पण मग हळूहळू वेदना तीव्र होऊ लागल्या आणि मला जाणवले की हे काही सामान्य नाहीये. मग डॉक्टरांनी सांगितले की ते फ्रॅक्चर आहे, परंतु त्यामुळे मी शूटिंग करण्यापासून थांबलो नाही. शो सुरू राहिला पाहिजे, नाही का? कलाकार आणि क्रू माझी खूप काळजी घेत आहेत आणि मला आवश्यक ती विश्रांती आणि औषधे मिळतील याची खात्री करत आहेत. त्यांच्या काळजी आणि शुभेच्छांसाठी मी खरोखर आभारी आहे. इतके लोक माझी काळजी घेतात हे जाणून मला प्रेरणा मिळते आणि मग हा प्रवास आणखी खास बनतो.”

हे हाय-व्होल्टेज नाट्य आणि थरारक अ‍ॅक्शन दृश्ये यांसह ‘कुमकुम भाग्य’ प्रेक्षकांना बसल्या जागी खिळवून ठेवेल

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…   नवीन वर्षा…