
no images were found
रंगात रंगलेले, आठवणींत भिजलेले‘सोनी सब’चे कलाकार सांगतायत त्यांच्या होळीच्या खास क्षणांबद्दल
होळी हा केवळ रंगाचा उत्सव नाही, तर तो आनंदाचा, एकत्र येम्याचा आणि जपलेल्या आठवणींचा उत्साव आहे. खेळकर बालपणीच्या परंपरांपासून ते विविध गॅदरींग्स.. असा हा सण प्रत्येकाच्या हृदयात एक विशेष स्थान राखणारा आहे. यंदाच्या होळीत सोनी सबचे कलाकार- आदित्य रेडिज, प्रियंका सिंग, कृष्ण भारद्वाज, अरव चौधरी आणि नवीन पंडिता हे त्यांच्या आवडत्या होळीच्या आठवणी सांगतात. तसेच हा सण का खास असतो, याबद्दल बोलतात.
तेनाली राम मालिकेत तेनाली रामाची भूमिका करणारे कृष्ण भारद्वाज म्हणतात- “होळी आणि गुजिया यांचे एक अतूट नाते आहे. मला आठवतं, मी घरी एकदा गुजिया बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण ते समोस्यांसारखेच झाले. माझी आई मला अजूनही त्यावरून चिडवते. सेटवर, आम्ही अनेकदा आम्ही होळीतील आवडत्या पदार्थांबद्दल बोलतो. माझ्यासाठी गरमागरम पकोड्यांची डिश आणि थंडाइचा ग्लास यापुढे काहीच नाही. खोड्यांबद्दल सांगायचं तर मी एकदा माझ्या मित्रांसाठी बनवलेल्या थंडाईच्या पेयात सेंद्रिय रंग मिसळले. त्यांचे चेहरे का धुतले जात नाहीयेत, हे ओळखण्यासाठी कित्येक तास लागले.”
तेनाली रामामध्ये कृष्णदेवरायाची भूमिका साकारणारे आदित्य रेडिज म्हणाले, “गेल्या अनेक वर्षात माझ्या होळीच्या अनेक आठवणी आहेत. काही कुटुंबियांसोबत आहेत, काही मित्रांसोबत आहेत. आता माझ्या मुलासोबत खास आठवणी आहेत. हवेत आनंदाचे रंग भरत असताना स्वयंपाकघरात विविध चवी असतील. कारण मी आपल्या सणासुदीतील आवडीच्या पदार्थांत काही पौष्टिकता आणण्याची योजना आखत आहे. सर्वांना आनंदी आणि सुरक्षित होळीच्या शुभेच्छा. तुमच्या मनांएवढी विविधरंगी आणि इच्छेनुसार आरोग्यदायी ही होळी असेल.”
वीर हनुमानमध्ये केसरीची भूमिका करणारे अरव चौधरी म्हणतात, “ होळी हा रंगांचा सण आहे. लहानपणापासूनच हा सण माझ्यासाठी खास आहे. जयपूरमध्ये आम्ही १० ते १५ दिवस आधीच हा सण सुरु करायचो. पाण्याच्या फुग्यांनी बादल्या भरायचो आणि सायकल चालवणाऱ्यांवर आमच्या पिचकाऱ्यांनी पाणी उडवायचो. खूप मजा यायची. आजही होळी हा आनंदाचा सण आहे. ही सर्वोत्तम सेलिब्रेशन श्री बच्चन यांच्या घरी झाले. तिथे रंग, संगीत, नृत्य आणि हास्याची लयलूट होती. आजकाल, मी घरीच हा सण साजरा करतो. माझ्या आवडत्या गुजियाचा आस्वाद घेतो- सुरक्षित राहण्यासाठी थंडाई टाळतो. होळी म्हणजे ऊर्जा, एकत्र येणे आणि भरपूर रंग.. बलम पिचकारीपासून ते रंग बरसे पर्यंतचे संगीत यामुळे होळी आणखी खास होते. आम्ही नैसर्गिक गुलालाने हा सण साजरा करत सणाची परंपरा जिवंत ठेवतो. सर्वांना होळीच्या शुभेच्छा.. ”
तेनालीरामामध्ये तिरुमलंबाची भूमिका साकारणारी प्रियंका सिंग म्हणते, “ माझ्या कुटुंबात होळी म्हणजे खाणे आणि मजा मस्ती.. माझी आई खूप छान गुजिया बनवते. त्याशिवाय कोणतीही होळी पूर्ण होत नाही. मीसुद्धा ते करण्याचा प्रयत्न करते, पण खाण्यात जास्त मजा आहे, असं मला वाटतं. मला चाटचे पदार्थही खूप आवडतात. मला आठवतं, मी एकदा माझ्या चुलत भावाला खूप मसालेदार पापडी चाट बनवून फसवलं होतं. त्याची प्रतिक्रिया खूप गंमतीची होती. मला होळी खेळायला आणि संगीताच्या तालावर नाचायलाही आवडते. माझ्या चाहत्यांना त्वचेची काळजी घेण्यासाठी मला एक सूचना द्यायची आहे, त्यांनी फक्त नैसर्गिक रंगांचा वापर करावा.. ”
पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत अश्विन पटेलची भूमिका करणारे नवीन पंडिता म्हणतात, “मला इको फ्रेंडली रंगांनी होळी खेळायला आवडते. कारण माझ्यासाठी होळी म्हणजे फक्त रंग आहेत. सेटवर दोन वर्षांपासून आम्हाला होळीची दृश्ये मिळाली आहेत. ज्यामुळे आम्हाला शूटिंग करताना सण साजरा करता आला, याचा मला आनंद वाटतो. माझ्या लहानपणीचा होळीच्या क्षणांपैकी एक आठवण म्हणजे माझ्या मित्रांनी मला गाफिल ठेवत पाण्याचा फुगा फोडून माझी खोडी काढली होती.