1 min read
0
0
16

no images were found

कलाकारांनी सांगितले त्‍यांच्‍या मूळगावामधील होळी सणाच्‍या साजरीकरणाबाबत!

होळी रंगांचा सण असण्‍यासोबत आनंद, परपंरा आणि एकतेला साजरा करणारा उत्‍सव आहे. अनेकांसाठी या सणाचे खरे सार मूळगावामध्‍ये साजरा केल्‍या जाणाऱ्या सणाच्‍या पद्धतीमध्‍ये सामावलेले आहे, जेथे रस्‍ते रंगांनी फुलून गेलेले असतात, प्राचीन परंपरांनुसार सण साजरा केला जातो आणि प्रियजन एकमेकांवर रंगांची उधळण करतात. एण्‍ड टीव्‍ही कलाकार योगेश त्रिपाठी (दरोगा हप्‍पू सिंग, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’) त्‍यांच्‍या मूळगावामधील होळी साजरीकरणाच्‍या गोड आठवणींना उजाळा देत आहेत, तसेच यंदा तेथे सण साजरा करण्‍याची किती आठवण येत आहे याबाबत सांगत आहेत. पण, सणाचा उत्‍साह कायम ठेवण्‍यासाठी त्‍यांनी त्‍यांच्‍या विशेष पद्धतीने सण साजरा करण्‍याचे नियोजन केले आहे, जेथे परंपरांचा आनंद घेतला जाईल जसे गुजिया बनवणे आणि परंपरेसह सण साजरा करणे, जे त्‍यांना त्‍यांच्‍या मूळ संस्‍कृतीशी जुडलेले ठेवतात. योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्‍पू सिंग म्‍हणाले, ”उत्तरप्रदेशमधील माझ्या मूळगावी होळी सण साजरा करण्‍याचा अनुभव अभूतपूर्व आहे. सर्वत्र रंग, आनंद व लोकसंगीतासह वातावरण उत्‍साहित झालेले असते. दरवर्षी, आम्‍ही प्रार्थना करत सण साजरा करतो, गुलालाची उधळण करतो, नृत्‍य करतो आणि गुजिया व थंडाई यांसारख्‍या उत्‍सवी ट्रीट्सचा आस्‍वाद घेतो. बरसानाची लाथमार होळी आणि वृंदावनची फूलों की होली अद्भुत असतात. यंदा, मी तेथे नसणार, पण मला तेथील ऊर्जेची, आनंदाने भरलेल्‍या रस्‍त्‍यांची आणि कुटुंब व मित्रांसोबत सण साजरा करणा-या क्षणांची आठवण येईल. पण, सणाचा उत्‍साह कायम ठेवण्‍यासाठी मी घरी गुजिया बनवणार आहे आणि पारंपारिक प्रथेसह सण साजरा करणार आहे. ज्‍यामुळे मूळगावापासून दूर असलो तरी मला माझ्या मूळ संस्‍कृतीशी जुडलेले असल्‍यासारखे वाटेल.” 

शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी उत्‍साह व्‍यक्‍त करत म्‍हणाल्‍या, ”मध्‍यप्रदेशमधील होळी नेहमी माझ्या मनाच्‍या जवळ आहे. होलिकादहनासह होळी सणाला सुरूवात होते, जेथे आम्‍ही होळीच्‍या भोवती एकत्र येतो, समृद्धता व आनंदासाठी प्रार्थना करतो. दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहरामध्‍ये रंगांची उधळण केली जाते आणि सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण असते. इंदौरमध्‍ये रंगपंचमी खास आकर्षण असते, जेथे भव्‍य मिरवणूका, संगीत व नृत्‍याचा आनंद घेतला जातो. यंदा घरापासून दूर असल्‍यामुळे मला या उत्‍साही सेलिब्रेशन्‍सची आठवण येत आहे. पण सणाचा उत्‍साह कायम ठेवण्‍यासाठी मी नमकीन व मालपुआ बनवणार आहे, जसे आम्‍ही घरी करतो. मी पारंपारिक होलिकादहनाच्‍या वेळी प्रार्थना देखील करणार आहे आणि मी कुठेही असले तरी माझ्या मूळगावातील होळीचा उत्‍साह माझ्यासोबत कायम राहिल, याची खात्री घेणार आहे. माझ्यासाठी होळी सणापेक्षा अधिक भावना आहे, ज्‍यामध्‍ये परंपरा व जुन्‍या आठवणींचे सुरेख संयोजन सामावलेले आहे.” 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…